IND Vs ENG Test: भारत-इंग्लंड कसोटीवर दहशतीचे सावट; गुरपतवंत सिंग पन्नूने दिली सामना रद्द करण्याची धमकी

IND Vs ENG Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना झारखंडची राजधानी रांची येथे 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

IND Vs ENG Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना झारखंडची राजधानी रांची येथे 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तत्पूर्वी, या सामन्यावर दहशतीचे सावट निर्माण झाले आहे. रांची येथे होणारा हा सामना रद्द करण्याची धमकी शिख फॉर जस्टिस संघटनेने दिली आहे. यासोबतच इंग्लंड क्रिकेट संघालाही माघारी जाण्याची धमकी देण्यात आली आहे.

दरम्यान, याप्रकरणी रांची पोलिसांनी तपास सुरु केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि रांचीचे डीसी राहुल सिन्हा स्वतः त्यावर लक्ष ठेवून आहेत. या धमकीच्या ऑडिओ-व्हिडिओची पडताळणी केली जात आहे. याप्रकरणी रांचीमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, शिख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने यूट्यूबवर एक व्हिडिओ जारी केला, ज्यामध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी क्रिकेट सामना रद्द करण्यासाठी सीपीआय (माओवादी) या भारतातील प्रतिबंधित संघटनेला आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Team India
IND vs ENG, Test: जयस्वालचं दणदणीत शतक, तर गिलचीही फिफ्टी! तिसऱ्या दिवसाअखेर भारताकडे 322 धावांची आघाडी

दुसरीकडे, शिख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू हा पंजाबचा रहिवासी आहे. मात्र तो सध्या अमेरिकेत राहतो. व्हिडिओमध्ये त्याने इंग्लंडच्या संघाला मायदेशी परतण्याची धमकीही दिली आहे. पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये हे दहशतवादी कृत्य असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

पन्नूच्या धमकीच्या व्हिडिओमध्ये काय आहे?

दरम्यान, या व्हिडिओमध्ये गुरपतवंत सिंग पन्नू सीपीआय या माओवादी संघटनेला आदिवासींच्या जमिनीवर क्रिकेट खेळू देऊ नका, असे आवाहन करताना दिसत आहे. बंदी घातलेल्या माओवादी संघटनेच्या माध्यमातून दोन मित्र देशांमधील क्रीडा संबंध बिघडवण्याचा आणि खेळात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न म्हणून प्रशासन याकडे पाहत आहे. अशा वादग्रस्त व्हिडिओंमुळे सरकारचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, असेही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलिन करण्याचाही प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन कारवाई सुरु केली आहे.

Team India
IND vs ENG, 3rd Test: रोहित-जडेजाचा शतकी दणका, तर सर्फराजचीही आक्रमक फिफ्टी; पहिल्या दिवशी भारताच्या 300 धावा पार

पन्नूच्या व्हिडिओची सत्यता तपासली जाईल

रांचीचे एसएसपी चंदन सिन्हा यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, रांचीच्या धुर्वा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र, पन्नूच्या या ऑडिओ-व्हिडिओची सत्यता तपासण्यात येत आहे. यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करुन ही धमकी देण्यात आली. विशेष म्हणजे, प्रतिबंधित स्थानिक माओवादी संघटनेला आदिवासींच्या जमिनीवर क्रिकेट सामना देऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

त्याचबरोबर भारत आणि इंग्लंड कसोटी सामन्यात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, भारत आणि इंग्लंड सामन्यातील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com