IND vs ENG: जडेजाने गाजवलं घरचं मैदान! शतक अन् पाच विकेट्स घेत केला मोठा पराक्रम

All-Rounder Ravindra Jadeja: इंग्लंडविरुद्ध राजकोटला झालेल्या कसोटीत जडेजाने फलंदाजी आणि गोलंदाजीतही आपले मोलाचे योगदान देत सामनावीराचा पुरस्कारही जिंकला आहे. याबरोबरच त्याने एक खास विक्रमही केला आहे.
Ravindra Jadeja
Ravindra JadejaPTI
Published on
Updated on

Ravindra Jadeja record:

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध राजकोटला झालेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात तब्बल 434 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने या कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.

भारताच्या या विजयात अष्टपैलू रविंद्र जडेजाने मोलाचा वाटा उचलला. त्याला या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

जडेजाने या सामन्यात त्याच्या घरच्या मैदानावर खेळताना भारताकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना 112 धावांची शतकी खेळी केली होती. दुसऱ्या डावात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

तसेच गोलंदाजी करताना त्याने पहिल्या डावात 2 विकेट्स घेतल्या होत्या, तर दुसऱ्या डावात त्याने 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. याबरोबरच त्याने एका मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली आहे.

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja Record: सर जडेजाने मोडला 27 वर्ष जुना रेकॉर्ड, अनिल कुंबळेला सोडले मागे; कुलदीप यादवही शर्यतीत

त्यामुळे जडेजाने एकाच कसोटी सामन्यात भारतासाठी शतक करणाऱ्या आणि डावात 5 विकेट्स घेणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दुसऱ्यांदा नाव नोंदवलं आहे.

यापूर्वी त्याने 2022 मध्ये मोहालीत श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामना खेळताना असा पराक्रम केला होता. त्याने त्या सामन्यात 175 धावांची नाबाद खेळी केली होती आणि गोलंदाजी करताना डावात 5 विकेट्सही घेतल्या होत्या.

दरम्यान आत्तापर्यंत एकाच कसोटी सामन्यात भारतासाठी शतक आणि डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी चारच खेळाडूंना करता आली आहे.

जडेजाव्यतिरिक्त अशी कामगिरी आर अश्विनने तब्बल तीनवेळा केली आहे. तसेच विनू मंकड आणि पॉली उम्रीगर यांनी प्रत्येकी एकदा अशी कामगिरी केली आहे.

Ravindra Jadeja
IND vs ENG: जडेजा - सर्फराजने घातलेला गोंधळ पाहून रोहितला राग अनावर, ड्रेसिंगरूमधील फोटो व्हायरल

एकाच कसोटीत भारतासाठी शतक आणि डावात 5 विकेट्स घेणारे क्रिकेटपटू

  • विनू मंकड (विरुद्ध इंग्लंड - 184 धावा आणि 196 धावांत 5 विकेट्स, लॉर्ड्स, 1952)

  • पॉली उम्रीगर (विरुद्ध वेस्ट इंडिज - नाबाद 172 धावा आणि 107 धावांत 5 विकेट्स, 1962)

  • आर अश्विन (विरुद्ध वेस्ट इंडिज - 103 धावा आणि 156 धावांत 5 विकेट्स, मुंबई 2011)

  • आर अश्विन (विरुद्ध वेस्ट इंडिज - 113 धावा आणि 83 धावांत 7 विकेट्स, नॉर्थ साऊंड, 2016)

  • आर अश्विन (विरुद्ध इंग्लंड - 106 धावा आणि 43 धावांत 5 विकेट्स, चेन्नई, 2021)

  • रविंद्र जडेजा (विरुद्ध श्रीलंका - नाबाद 175 धावा आणि 41 धावांत 5 विकेट्स, मोहाली, २०२२)

  • रविंद्र जडेजा (विरुद्ध इंग्लंड - 112 धावा आणि 41 धावांत 5 विकेट्स, राजकोट, 2024)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com