Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरला मिळाली मोठी जबाबदारी, निवडणूक आयोगाने बनवले नॅशनल आयकॉन

Sachin Tendulkar: क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने त्याला राष्ट्रीय आयकॉन बनवले आहे.
Sachin Tendulkar
Sachin TendulkarDainik Gomantak
Published on
Updated on

Sachin Tendulkar: क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने त्याला राष्ट्रीय आयकॉन बनवले आहे.

आता सचिन नॅशनल आयकॉन म्हणून निवडणूक आयोगासोबत नवी इनिंग सुरु करणार आहे. मंगळवारी ऑल इंडिया रेडिओ, नवी दिल्ली येथील रंग भवन येथे आयोजित कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.

खरे तर, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत निवडणूक आयोग व्यस्त आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि अधिकाधिक प्रोत्साहित करण्यासाठी, EC ने क्रिकेट जगतातील सर्वात मोठ्या स्टावर ही जबाबदारी सोपवली आहे. आता सचिन निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करताना दिसणार आहे.

Sachin Tendulkar
Sachin Tendulkar : 'मी फेडररसारखे कार्लोसलाही 10-12 वर्षे...', मास्टर-ब्लास्टरकडून विम्बल्डन विजेत्याचं तोंडभरून कौतुक

हे दिग्गज राष्ट्रीय आयकॉन राहिले आहेत

निवडणूक आयोगाने (Election Commission) प्रसिद्धीपत्रक जारी केले असून, आयोगाने गेल्या वर्षी अभिनेता पंकज त्रिपाठी याची नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली होती.

यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा एम.एस. धोनी, चित्रपट अभिनेता आमिर खान आणि बॉक्सर मेरी कोम सारख्या दिग्गजांना राष्ट्रीय आयकॉन म्हणून निवडण्यात आले होते.

Sachin Tendulkar
Sachin Tendulkar lodged complaint: खोट्या जाहिरातींमुळे मास्टर-ब्लास्टरचे मोठे पाऊल, FIR देखील दाखल, जाणून घ्या प्रकरण

सचिन तेंडुलकरची स्वच्छ प्रतिमा

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. संपूर्ण क्रिकेट विश्वात त्याची प्रतिमा स्वच्छ आहे. 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत या दिग्गजाने आपली प्रतिमा स्वच्छ ठेवली. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या सचिनचे ट्विटरवर 39 मिलियन फॉलोअर्स आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com