Sachin Tendulkar lodged complaint: खोट्या जाहिरातींमुळे मास्टर-ब्लास्टरचे मोठे पाऊल, FIR देखील दाखल, जाणून घ्या प्रकरण

सचिन तेंडुलकरने खोट्या जाहिरातींमुळे मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
Sachin Tendulkar
Sachin TendulkarDainik Gomantak
Published on
Updated on

Sachin Tendulkar lodged police complaint against unauthorized advertisements: भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने मुंबई पोलिसांकडे खोट्या जाहिरांतीसंदर्भात तक्रार दाखल केली असल्याचे मोठी माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी एफआयआर (FIR) देखील नोंदवला आहे.

अनेक जाहिरातींमध्ये मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आवाज, फोटो आणि नाव यांचा परवानगी शिवाय वापर केला जात असल्याने त्याने ही तक्रार दाखल केली आहे.

Sachin Tendulkar
Sachin Tendulkar Birthday: 'फॅमिलीमॅन' सचिनच्या कुटुंबातील सदस्य माहित आहेत का? पाहा फोटो

सचिनचा आरोप आहे की त्याच्या आवाजाचा, फोटोंचा आणि नावाचा वापर करून लोकांची फसवणूक केली जात आहे. तसेच हे सर्व इंटरनेटच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने काही आज्ञात लोकांविरुद्ध भारतीय दंड संहितेतील कलम 426, 465 आणि 500 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

सचिनने याबद्दल एक ट्वीटही केले आहे. यामध्ये एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेडच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की 'आम्ही खूप दिवसांपासून हे पाहात आहोत की सचिन तेंडुलकरच्या नावाने अवैध प्रकारे अनेक प्रोडक्ट विकले जात आहेत. त्या प्रोडक्टशी सचिनचा काहीही संबंध नाही.'

'यामुळे नागरिकांचा मार्ग भटकू शकतो. ते या फसवणूकीमध्ये अडकून अवैध प्रोडक्ट खरेदीही करू शकतात. याच प्रकरणाबाबत आम्ही अधिकृत तक्रार सायबर सेल डिपार्टमेंटकडे केली आहे.'

Sachin Tendulkar
Sachin Tendulkar: मोपावर सचिनला पाहताच तो धावला अन् गडबडीत असताना सुद्धा सचिनने चिमुकल्याची पूर्ण केली इच्छा

याशिवाय या ट्वीटमध्ये सचिनचे कोणकोणत्या कंपनीबरोबर खरे करार आहे, याची माहिती कशी मिळू शकेल, याबद्दलही सांगितले आहे. या ट्वीटमध्ये सांगितले आहे की सचिन सध्या कोणत्या कंपन्यांशी आणि लोकांशी संबंधित आहे हे तपासण्यासाठी https://sachintendulkar.com/ या वेबसाईटवरून माहिती घेतली जाऊ शकते. यामुळे लोक स्वत: सचिन कोणत्या जाहिराती करतो हे देखील तपासू शकतात.

सचिन हा केवळ भारतातीलच नाही, तर जगातील महान खेळाडूंमध्ये गणला जातो. त्यामुळे त्याचे करोडो चाहतेही आहेत. त्याचमुळे त्याची लोकप्रियताही मोठी असल्याने त्याचाच चूकिच्या पद्धतीने फायदा काही लोक घेत असल्याचे दिसत आहे. आता या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com