Ruturaj Gaikwad: 'सुवर्णपदक जिंकून पोडियमवर...', भारताचा कॅप्टन झालल्या ऋतुराजने फुंकले रणशिंग

Ruturaj Gaikwad Video: भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यानंतर ऋतुराज गायकवाडने प्रतिक्रिया दिली आहे.
Ruturaj Gaikwad
Ruturaj GaikwadDainik Gomantak
Published on
Updated on

Dream would be to win gold medal in Asian Games Says Ruturaj Gaikwad: शुक्रवारी (14 जुलै) बीसीसीआयने चीनमध्ये होणाऱ्या आगामी एशियन गेम्ससाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे कर्णधारपद महाराष्ट्राचा 26 वर्षीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले आहे. याबद्दल आता ऋतुराजने प्रतिक्रिया दिली आहे.

19 व्या एशियन गेम्समध्ये पुरुषांची क्रिकेट स्पर्धा 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान टी20 क्रिकेट प्रकारात खेळवली जाणार आहे. दरम्यान संघाची घोषणा झाल्यानंतर बीसीसीआयने ऋतुराजचा शनिवारी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ऋतुराजने मिळालेल्या संधीबद्दल आनंद व्यक्त केला असून सुवर्णपदक जिंकू अशी आशा व्यक्त केली आहे.

ऋतुराज म्हणाला, 'या संधीबद्दल खरंच कृतज्ञ आहे. भारतासाठी खेळणेच अभिमानाची गोष्ट आहे. त्यातच संघाचे इतक्या मोठ्या स्पर्धेत नेतृत्व करणे ही माझ्यासाठी आणि सर्वांसाठीच मोठी संधी आहे. त्यामुळे नक्कीच खुश आहे आणि अभिमानही वाटत आहे.'

Ruturaj Gaikwad
MS Dhoni: 'मी खूप लकी...' धोनीबद्दल ऋतुराज अन् जयस्वालमध्ये रंगल्या गप्पा, पाहा व्हिडिओ

तो पुढे म्हणाला. 'हे मजेशीरही असेल कारण आम्ही सर्व युवा खेळाडू आहोत आणि आम्ही एकमेकांना गेल्या एक-दोन वर्षांपासून चांगले ओळखतो, आम्ही एकमेकांविरुद्ध आयपीएल खेळलो आहे आणि भारत अ संघासाठीही खेळलो आहे आणि भारतासाठीही काही सामने खेळलोय. त्यामुळे मला वाटते की हा मजेशीर ग्रुप आहे, ज्याचा मी भाग आहे.'

'नक्कीच देशासाठी पदक जिंकणे ही एक गोष्ट आहेच. टेलिव्हिजनवर आपल्या खेळाडूंना पदके जिंकताना पाहातच आम्ही मोठे झालो आहेत. त्यामुळे सहाजिकच तिथे जाऊन पदक जिंकण्याची संधी मिळणे खूप खास आहे.'

एशियन गेम्ससाठी निवडलेल्या भारतीय संघात अनेक युवा खेळाडू आहेत. एशियन गेम्ससाठी निवडण्यात आलेल्या संघात यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा या युवा खेळाडूंसह शिवम दुबे, आवेश खान, अर्शदीप सिंग, रबी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर अशा भारताकडून यापूर्वी खेळलेल्या खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे.

Ruturaj Gaikwad
Ruturaj Gaikwad: जेव्हा ऋतुराज पहिल्यांदा धोनीला भेटला होता...

ऋतुराज पुढे म्हणाला, 'भारतीय चाहते म्हणून देश खेळत असलेल्या कोणत्याही खेळासाठी पाठिंबा दिला जातो. कोणतीही मालिका असो, कोणताही वर्ल्डकप असो, पण मला वाटते की हे नक्कीच काहीतरी खास आहे. आम्ही तिथे क्रिकेट अशा दर्जेने खेळू की ज्याचा देशातील प्रत्येकाला अभिमान वाटेल.'

'सुवर्णपदक जिंकणे आणि पोडियमवर उभे राहून देशाचे राष्ट्रगीत गाणे, हे नक्कीच स्वप्न आहे.'

एशियन गेम्ससाठी भारताचा पुरुष संघ

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक)

राखीव खेळाडू - यश ठाकूर, आर साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा आणि साई सुदर्शन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com