Pranali Kodre
भारताचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाचा महत्त्वाचा भाग आहे.
त्यामुळे ऋतुराजची चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीबरोबरच चांगली मैत्रीही आहे.
अनेकांनी तर धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार म्हणून ऋतुराजला पसंतीही दिली आहे.
पण अनेक चाहत्यांना माहित नसेल की धोनी आणि ऋतुराज सर्वात पहिल्यांदा आयपीएलमध्ये नाही, तर रणजी ट्रॉफी दरम्यान पहिल्यांदा भेटले होते.
त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल एकदा ऋतुराजने सोशल मीडियावर पोस्टही केली होती.
साल 2016 मध्ये 6 ते 9 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्र आणि झारखंड संघात रणजी सामना झाला होता. हा ऋतुराजचा पदार्पणाचा रणजी सामनाही होता.
त्याचवेळी धोनी झारखंड संघाच्या मार्गदर्शकाची भूमिका निभावत होता.
दरम्यान, ऋतुराज पहिलाच रणजी सामना खेळताना वरुण ऍरॉनचा चेंडू लागल्याने दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाले होते.
त्यावेळी धोनी सामन्याच्या लंचब्रेकमध्ये ऋतुराजला भेटण्यासाठी आला होता आणि त्याची विचारपूस केल होती.
धोनीने त्यावेळी ऋतुराजच्या प्लॅस्टरवर लवकर बरा होण्याबद्दल मेसेजही लिहिला होता. ही त्यांची पहिली भेट होती.
त्यानंतर तीन वर्षांनी 2019 साली ऋतुराज चेन्नई सुपर किंग्सचा भाग झाला आणि 2020 साली त्याने या संघाकडून पदार्पण केले.
चेन्नई सुपर किंग्स संघात असल्याने ऋतुराजचे धोनीबरोबर खेळण्याचे आणि ड्रेसिंग रुम शेअर करण्याचे स्वप्नही पूर्ण झाले.