पाकिस्तान संघाचा कर्णधार आझम आणि मुख्य निवडकर्ता वसीम यांच्यात मतभेद

शान मसूदने केवळ T20 ब्लास्टमध्येच नव्हे तर पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये देखील चमकदार कामगिरी केली आहे.
Pakistan cricket team
Pakistan cricket team Dainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तान क्रिकेट संघाला त्यांच्याच घरामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वीच संघांत फूट पडल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम आणि मुख्य निवडकर्ता मोहम्मद वसीम यांच्यात मतभेद आहेत.

Pakistan cricket team
'...कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये'; भारतासह या देशांचा मजबूत दावा

वास्तविक बाबर आझम आणि मोहम्मद वसीम यांच्यातील हे युद्ध शान मसूदवरून सुरू झाले आहे. मसूदच्या फलंदाजीच्या क्रमाबद्दल दोघांचेही मत भिन्न आहेत. इंग्लंडच्या देशांतर्गत T20 ब्लास्ट स्पर्धेत डर्बीशायर फाल्कन्सकडून खेळताना शान मसूदने अलीकडेच चमकदार कामगिरी केली होती.

Pakistan cricket team
जीएफए फुटबॉल स्पर्धेत साळगावकरला उपविजेतेपद, एफसी गोवास तिसरे स्थान

नुकतेच वसीम एका यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला होता, 'मी अभिमानाने सांगितले आहे की आता त्याने (शान मसूद) मधल्या फळीत फलंदाजी करावी.' मात्र, बाबर आझमचे वसीमच्या अगदी उलट मत आहे. बाबरने प्रत्युत्तर देत वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'शान मसूद वरच्या फळीत फलंदाजी करत आहे. त्याने कधीही खालच्या फळीत फलंदाजी केली नाही. मला विश्वास आहे की जर शानला 5 किंवा 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करायला लावले तर ते योग्य होणार नाही.

शान मसूदने केवळ T20 ब्लास्टमध्येच नव्हे तर पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये देखील चमकदार कामगिरी केली आहे. तो मुलतान सुलतानकडून खेळला. पीएसएलच्या चालू हंगामात त्याने 12 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 478 धावा केल्या. यानंतर त्याला संघात आणून संधी देण्याची मागणी होत होती.लाइव्ह टीव्हीनेही हे वाचा फोडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com