'...कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये'; भारतासह या देशांचा मजबूत दावा

दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी सर्व कसोटी संघांमध्ये स्पर्धा आहे.
Lord's Stadium
Lord's StadiumDainik Gomantak
Published on
Updated on

दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी सर्व कसोटी संघांमध्ये स्पर्धा आहे. 2023 मध्ये होणाऱ्या फायनलसाठी ऑस्ट्रेलियाचा दावा मजबूत दिसत आहे. त्यांचे 72 गुण आणि 75 गुणांची टक्केवारी आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका 60 गुण आणि 71.43 गुणांच्या टक्केवारीसह दुसऱ्या तर भारत 77 गुण आणि 58.33 गुणांच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे. या तिन्ही देशांचा दावा सध्या सर्वात मजबूत आहे. (The final match of the World Test Championship could be held at the historic Lord's Stadium in England in 2023)

दरम्यान, कोरोनामुळे 2021 मध्ये इंग्लंडमध्ये (England) अनेक निर्बंध लागू होते. यामुळेच फायनल लॉर्ड्सवरुन साउथम्प्टनला हलवण्यात आली. मैदानासोबत साउथम्प्टनमध्ये एक हॉटेल देखील आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंना बायो बबलमध्ये ठेवणे सोपे होते. आता इंग्लंडसह जगभरातील कोरोनाचे (Corona) निर्बंध शिथिल आहेत. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) WTC फायनल लॉर्ड्सवर आयोजित करण्याचा विचार करत आहे.

Lord's Stadium
पहिली काइटबोर्डिंग नॅशनल रँकिंग चॅम्पियनशिप संपन्न | Gomantak Tv

तसेच, 2023 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या लॉर्ड्सवर आयोजित करण्याबाबत, ICC चेअरमन ग्रेग बार्कले म्हणाले, ''आम्ही यावेळी लॉर्ड्सवर विजेतेपदाचा सामना आयोजित करण्याचा विचार करत आहोत. मात्र, याबाबत आम्ही निर्णय घेतलेला नसून लवकरच याबाबत निर्णय घेऊ. आता कोरोनाशी संबंधित कोणतेही निर्बंध नाहीत, त्यामुळे लॉर्ड्सपेक्षा चांगला पर्याय आहे, असे मला वाटत नाही.''

न्यूझीलंड कसोटीत पहिला चॅम्पियन ठरला

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या आवृत्तीत न्यूझीलंडचा संघ चॅम्पियन बनला होता. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने (New Zealand) भारताचा आठ गडी राखून पराभव केला. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील किवी संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा पराभव करुन विजेतेपद पटकावले.

Lord's Stadium
'आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप' पॉइंट्स टेबलमध्ये भारत दक्षिण आफ्रिकेच्या खाली

लॉर्ड्सवर इंग्लंडला पुढील एका वर्षात फक्त दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामुळे लॉर्ड्सवर अंतिम सामना होण्याची शक्यता बळावली आहे. ते अंतिम होण्यापूर्वी काही काम बाकी आहे. आयसीसी पुढील महिन्यात होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यजमानपदाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

वनडे वर्ल्ड कपचे पहिले दोन अंतिम सामनेही लॉर्ड्सवर खेळले गेले

यापूर्वी, एकदिवसीय विश्वचषकाच्या पहिल्या दोन आवृत्त्यांचे आयोजनही इंग्लंडने केले होते. इंग्लंडने 1975 आणि 1979 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवले होते. क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्सवर या दोन्ही स्पर्धांचा अंतिम सामना खेळला गेला. वेस्ट इंडिज संघाने पहिल्या दोन आवृत्त्या जिंकल्या. विंडीजने 1975 मध्ये ऑस्ट्रेलियाला आणि 1979 मध्ये इंग्लंडचा पराभव केला होता.

Lord's Stadium
कसोटी क्रिकेटचे भवितव्य धोक्यात? आयसीसी अध्यक्ष म्हणाले..

शिवाय, पाकिस्तानात जाऊन कसोटी मालिका जिंकणे ऑस्ट्रेलियासाठी फायदेशीर ठरले. त्याचबरोबर कसोटी मालिकेत भारताचा 2-1 असा पराभव करणे दक्षिण आफ्रिकेसाठी फायदेशीर ठरले. भारताला श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून कडवी टक्कर मिळू शकते. मात्र, टीम इंडियासाठी (Team India) ही चांगली गोष्ट आहे की, त्यांना इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी अनिर्णित ठेवावी लागली आहे. तसेच, संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळायची आहे. तो जिंकल्यास टीम इंडियाचा दावा आणखी मजबूत होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com