IND vs SA: 'या' 4 कारणांमुळे पहिली कसोटी जिंकूनही टीम इंडियाने...

भारताला पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कसोटी मालिका जिंकण्यात अपयश आले. तीन सामन्यांच्या मालिकेत त्यांना 2-1 ने पराभवाचा सामना करावा लागला.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

भारताला पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्यात अपयश आले. तीन सामन्यांच्या मालिकेत त्यांना 2-1 ने पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्ग आणि केपटाऊन (Cape Town) कसोटी जिंकल्या तर भारताने सेंच्युरियनमध्ये खेळली गेलेली पहिली कसोटी जिंकली. या वेळी विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रोटीज संघाच्या भूमीवर कसोटी विजयाचा दुष्काळ संपवू शकेल, असा विश्वास मालिका सुरु होण्यापूर्वीच होता. त्यांच्याकडे मजबूत गोलंदाज आणि दिग्गज फलंदाजांची खाण होती. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे भारताला विजय मिळवता आला नाही. यासह दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कसोटी मालिका जिंकण्याची त्याची प्रतीक्षा कायम आहे.

आउट ऑफ फॉर्म मिडल ऑर्डर - कसोटी मालिकेत भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे मधल्या फळीचे अपयश. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), अजिंक्य रहाणेसारखे फलंदाज एकही मोठी खेळी खेळू शकले नाहीत. या मालिकेतील दोघांची सरासरी 25 च्या आसपास होती, यावरुनच दोघेही किती फॉर्मात होते ते समजेल. प्रत्येकी सहा डाव खेळूनही दोघांनाही प्रत्येकी एकच अर्धशतक ठोकता आले. या दोघांपैकी एकानेही मोठी खेळी उभारता आली नाही. तर जोहान्सबर्ग (Johannesburg) आणि केपटाऊनमध्ये भारताला मोठी धावसंख्या करता आली असती.

Team India
IND vs SA: 'तुम्ही कधीच तरुणांचा आदर्श होऊ शकत नाही!

खराब झेल- या मालिकेदरम्यान खराब झेलमुळे भारताची निराशा झाली. अनेक महत्त्वाच्या प्रसंगी क्षेत्ररक्षकांनी गोलंदाजांची निराशा केली. बहुतेक झेल विकेटच्या मागे सोडले गेले. या अंतर्गत स्लिप आणि कीपरला मिळालेल्या संधींचा फायदा घेता आला नाही. चेतेश्वर पुजारा, केएल राहुल आणि विराट कोहलीसारखे मोठे खेळाडू स्लिपमध्ये उभे आहेत. परंतु राहुल आणि पुजाराने इथे तत्परता दाखवण्यात अपयशी ठरले. केपटाऊन कसोटीबद्दलच बोलायचे झाले तर पुजाराने दुसऱ्या डावात कीगन पीटरसनचा सोपा झेल सोडला. हा झेल सोडला तेव्हा दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 86 धावांची गरज होती. नंतर पीटरसन 82 धावा करुन बाद झाला. त्याचप्रमाणे पहिल्या डावात टेंबा बावुमाचा झेल पंतने हुकवला. याचा फायदा घेत दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या धावसंख्येच्या जवळपास पोहोचला.

टीम कॉम्बिनेशनमध्ये गडबड - भारतीय संघ सहा फलंदाज आणि पाच गोलंदाजांसह मालिकेत दाखल झाला होता. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान खेळपट्ट्यांवर हा सट्टा मात्र चालला नाही. भारताने अश्विनला आफ्रिकन खेळाडूंचा समाचार घेण्यासाठी मैदानात उतरवले होते. अशा परिस्थितीत त्याचा फारसा उपयोग होऊ शकला नाही. भारताने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्येही अशीच रणनीती अवलंबली होती. अश्विनच्या जागी भारताला दक्षिण आफ्रिकेत हनुमा विहारीला खेळवता आले असते. विहारी फिरकी गोलंदाजीही करतो. त्यामुळे भारताला अतिरिक्त फलंदाज मिळाले असते. तसेच, अश्विनने जितकी षटके टाकली, तितकी षटकेही तो करु शकला असता.

Team India
Ind VS SA: 145 वर्षांच्या कसोटी इतिहासात जे कधीही घडले नाही ते...

गोलंदाजीत नशिबाचा अभाव- भारताकडे सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहेत. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांसारख्या गोलंदाजांमुळे भारत परदेशी खेळपट्ट्यांवरही चमत्कार करतो. परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान टीम इंडिया अडचणीत आली आहे. गोलंदाजीदरम्यान भारतीय गोलंदाजांनी पूर्ण ताकदपणाला लावली. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनीही भारतीय वेगवान गोलंदाजी खूप आव्हानात्मक असल्याचे मान्य केले. मात्र उत्कृष्ट गोलंदाजी करुनही गोलंदाजांना वेळेवर विकेट मिळवता आल्या नाहीत. नशीब त्यांच्या बाजूने नव्हते असेच यामधून म्हणता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com