IND vs SA: 'तुम्ही कधीच तरुणांचा आदर्श होऊ शकत नाही!

माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला, कोहलीने जे काही केले त्यानंतर तरुण त्याला आदर्श मानणार नाहीत.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये मालिकेतील तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कर्णधार डीन एल्गरला (Dean Elgar) रिव्ह्यूमध्ये मिळालेल्या जीवनदानानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. हॉक आयचा निर्णय विराट कोहलीला (Virat Kohli) मान्य नव्हता आणि अशा परिस्थितीत त्याने मैदानावर उघडपणे आपला राग व्यक्त केला. कोहली स्टंप माइकवर गेला काहीतरी बोलला. त्याचवेळी तो रागाच्या भरात जमिनीवर पाय आपटतानाही यावेळी दिसला. भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने कोहलीच्या या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, डावाच्या 27 व्या षटकात आर अश्विनचा चेंडू एल्गरच्या पॅडला लागला आणि अंपायरने दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराला एलबीडब्ल्यू आऊट केले. एल्गरने डॉ. हॉक आयने चेंडू लेग स्टंपवरुन जात असल्याचे दाखवले आणि त्यामुळेच एल्गरला जीवदान मिळाले. कोहली स्टंपजवळ गेला आणि म्हणाला, 'जेव्हा तुमचा संघ चेंडू चमकत असेल, तेव्हा त्याच्याकडे लक्ष द्या. नेहमी विरोधी संघाकडे पाहू नका.'' कोहलीच्या या कृतीला अपरिपक्व कृती म्हटले गेले.

Virat Kohli
Ind VS SA: 145 वर्षांच्या कसोटी इतिहासात जे कधीही घडले नाही ते...

गंभीरने कोहलीला फटकारले

यावर, माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला, कोहलीने जे काही केले त्यानंतर तरुण त्याला आदर्श मानणार नाहीत. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना तो म्हणाला, 'कोहली अपरिपक्व आहे. टीम इंडियाचा कर्णधार असल्याने स्टंपवर असे बोलणे चुकीचे आहे. असे करुन तुम्ही तरुणांसाठी कधीही आदर्श बनू शकत नाही. पहिल्या डावात यष्टीरक्षक झेल 50-50 टक्के होता, तेव्हा तू शांत होतास तेव्हा मयंक अपील करत होता. मला वाटते की, द्रविडने या प्रकरणी कोहलीशी बोलले पाहिजे.

एनगिडी यांनीही मोठे वक्तव्य केले

त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचा संघही कोहली आणि टीम इंडियाच्या कृतीवर खूश दिसला नाही. टीम इंडियाचा (Team India) वेगवान गोलंदाज लुंगी न्गिडी म्हणाला की, टीम इंडियाच्या खेळाडूंच्या कृतीवरुन हे दिसून येते की, त्यांना दडपण जाणवत आहे. Ngidi पुढे म्हणाले, 'मला वाटते की अशी प्रतिक्रिया निराशा दर्शवते. संघ अनेकदा याचा फायदा घेतात. तुम्हाला तुमच्या भावना कधीच भडकपणे जास्त व्यक्त करायच्या नसतात, परंतु तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की त्याला खूप भावना अनावर झाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com