Ind VS SA: 145 वर्षांच्या कसोटी इतिहासात जे कधीही घडले नाही ते...

अशाप्रकारे, कसोटी क्रिकेटच्या (Test Cricket) इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा एका कसोटी सामन्यात एका संघाच्या सर्व 20 विकेट फक्त कॅच आऊटने पडल्या.
Ind VS SA
Ind VS SADainik Gomantak
Published on
Updated on

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत वेगवान गोलंदाजांनी आपली ताकद दाखवली. तर दुसरीकडे फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागला. केपटाऊनमध्ये झालेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात फलंदाजी आणखी कठीण झाली. तर वेगवान गोलंदाज पूर्णपणे वरचढ ठरले. याचे सर्वात नेत्रदीपक दृश्य भारताच्या दुसऱ्या डावात पाहायला मिळाले, जिथे कसोटी क्रिकेटच्या (Test Cricket) 145 वर्षांच्या इतिहासात कधीही न घडलेली अशी आश्चर्यकारक गोष्ट घडली.

केपटाऊन (Cape Town) कसोटीत भारताचा दुसरा डाव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अवघ्या 198 धावांवर आटोपला. भारताच्या डावातील सर्व विकेट कॅचमधून पडल्या. पहिल्या डावातही असेच काहीसे घडले आणि भारताच्या डावातील सर्व 10 विकेट कॅचद्वारे पडल्या.

Ind VS SA
IND Vs SA: ऋषभ पंतने अर्धशतक ठोकत विक्रमांना घातली गवसणी

अशाप्रकारे, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा एका कसोटी सामन्यात एका संघाच्या सर्व 20 विकेट फक्त कॅच आऊटने पडल्या. या 20 झेलांपैकी 7 झेल दक्षिण आफ्रिकेकडून (South Africa) यष्टिरक्षक काइल रेनने दोन्ही डावात घेतले. व्रेनने पहिल्या डावात 5 झेल आणि दुसऱ्या डावात विकेट्समागे 2 झेल घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com