Shocking News: क्रिकेटविश्वात खळबळ! दिल्लीच्या खेळाडूंकडून अल्पवयीन मुलीची छेडछाड

Delhi & District Cricket Association: मैदानातील सुमार कामगिरीमुळे आधीच टीकेचे धनी ठरत असलेल्या दिल्ली क्रिकेटमध्ये आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Delhi Under-19 cricketers accused
Delhi Under-19 cricketers accusedDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: मैदानातील सुमार कामगिरीमुळे आधीच टीकेचे धनी ठरत असलेल्या दिल्ली क्रिकेटमध्ये आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्लीच्या अंडर-१९ संघातील दोन खेळाडूंवर पुडुचेरी येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली असून, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (DDCA) शिस्तपालनावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीचा १९ वर्षांखालील संघ सध्या सामन्यांसाठी पुडुचेरी दौऱ्यावर आहे. याच दरम्यान संघातील दोन खेळाडूंनी एका अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला.

ही घटना समोर येताच डीडीसीए प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आणि प्रकरणाची व्याप्ती वाढू नये यासाठी संघ प्रशासनाने तातडीने दोन्ही संशयित खेळाडूंना संघ मुक्काम करत असलेल्या हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवले आहे. या प्रकरणाची सध्या अधिकृतरीत्या चौकशी सुरू आहे.

Delhi Under-19 cricketers accused
Goa Night Club Fire: 'क्लबमध्ये ‘पायरो’ पेटवणारे अजूनही मोकाटच!', लुथरा बंधूंच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण; 5 फेब्रुवारीला फैसला

डीडीसीए प्रशासनाचा सावध पवित्रा

या संवेदनशील विषयावर प्रतिक्रिया देताना डीडीसीएचे सह-सचिव अमित ग्रोवर यांनी छेडछाडीच्या आरोपांचे खंडन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, हा प्रकार छेडछाडीचा नसून केवळ शिस्तभंगाचा आहे.

खेळाडू हॉटेलच्या खोलीत अत्यंत मोठ्या आवाजात गाणी ऐकत होते, ज्याला हॉटेलमधील इतर पाहुण्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी विरोध केला होता. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, असोसिएशन या प्रकरणाला गांभीर्याने घेत असून, खेळाच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये यासाठी अंतर्गत स्तरावर कडक हालचाली सुरू आहेत.

Delhi Under-19 cricketers accused
Goa Water Issue: पर्यटन नगरीत जलसंकटाची चाहूल; राज्यातील 59% जलस्रोत प्रदूषित तर 39 तलाव 'सर्वात खराब' श्रेणीत

शिस्त आणि प्रतिमेचा प्रश्न

दिल्ली क्रिकेटचा गेल्या काही काळातील आलेख पाहता, मैदानाबाहेरील अशा वादांमुळे संघाची प्रतिमा मलिन होत आहे. जरी अधिकारी याला 'शिस्तभंग' म्हणत असले, तरी अल्पवयीन मुलीशी संबंधित आरोपांमुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. दोषी आढळल्यास संबंधित खेळाडूंवर कडक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com