Australian Open 2023: विजेतेपदाच्या शर्यतीत ट्वीस्ट! गतविजेत्या नदालला पराभवाचा मोठा धक्का

ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेत गतविजेत्या राफेल नदालला पराभवाचा धक्का बसला आहे.
Rafael Nadal
Rafael NadalDainik Gomantak

Australian Open 2023: स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याला दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या मॅकेन्झी मॅकडोनल्डविरुद्ध 6-4, 6-4, 7-5 अशा सरळ तीन सेटमध्ये पराभवाचा धक्का बसला.

त्याला या सामन्यादरम्यान दुखापतीचा सामना करावा लागला होता. त्याच्या डाव्या नितंबात ताण आला होता. अखेर तीन सेटमध्ये विजयासाठी संघर्ष केल्यानंतर त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. पण आता गतविजेत्या नदालच्या बाहेर पडल्याने विजेतेपदाच्या शर्यतीत ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे.

(Defending champion Rafael Nadal out of Australian Open 2023)

Rafael Nadal
Roger Federer शेवटच्या सामन्यात झाला भावूक, नडाललाही अश्रू झाले अनावर

दरम्यान, अव्वल मानांकित नदालले दुखापतीचा सामना करत असातानाही २ तास ३२ मिनिटे संघर्ष केला. त्याला दुसऱ्या सेटमध्ये मेडिकल टाईमआऊटही घ्यावा लागला होता. त्यावेळी तो सेटमध्ये मॅकडोनल्डपेक्षा 5-3 फरकाने पिछाडीवर होता. दरम्यान, मॅकडोनल्डसाठी सर्वात यशस्वी टेनिसपटू असलेल्या नदालला पराभूत करणे मोठे यश आहे.

नदालने गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते. पण, तो यावेळी विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर झाला असल्याने त्याला 23 व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

नदालने सात वर्षांनंतर पहिल्यांदाच एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत इतक्या लवकर बाहेर गेला आहे. यापूर्वी तो 2016 साली ऑस्ट्रेलियन ओपनमध्येच पहिल्या फेरीत बाहेर गेला होता. त्याला त्यावेळी फर्नांडो वर्डास्कोविरुद्ध 5 सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.

दरम्यान, बुधवारी नदालला पराभूत करणारा मॅकडोनल्ड यापूर्वी अमेरिकेत एनसीएए चॅम्पियनशिप जिंकला आहे. पण तो कधीही ग्रँडस्लॅम स्पर्धेत चौथ्या फेरीच्या पुढे अद्याप जाऊ शकलेला नाही. तो सध्या जागतिक क्रमवारीत 65 व्या क्रमांकावर आहे. त्याने यापूर्वी नदालचा फ्रेंच ओपन 2020 स्पर्धेत सामना केला होता. त्यावेळी त्याला केवळ 4 गेम जिंकता आल्या होत्या.

Rafael Nadal
India vs New Zealand: वनडेमध्ये कोणाचं वर्चस्व? एका क्लिकवर जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड्स

सामन्यानंतर मॅकडोनल्ड म्हणाला, 'नदाल शानदार चॅम्पियन आहे. तो कोणतीही परिस्थिती असताना हार मानत नाही. अशा खेळाडूविरुद्ध खेळणे नेहमीच कठीण असते. मी या सामन्यात जे करत आहे, त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होतो आणि तो मला त्यावरून विचलित करण्याचा प्रयत्न करत होता. पण मी माझ्यावर लक्ष केंद्रित करत होतो.'

'शेवटच्यावेळी जेव्हा मी त्याच्याविरुद्ध खेळलो होतो, त्यावेळी त्याने पूर्ण वर्चस्व ठेवले होते. क्ले कोर्टवर खेळणे कठीण आहे. पण मला हार्ड कोर्टवर माझा खेळ करायला आवडतो. मला त्याच्याविरुद्ध हार्ड कोर्टवर खेळायचे होते आणि मला आनंद आहे की मला ती संधी मिळाली.'

आता मॅकडोनल्डचा तिसऱ्या फेरीतील सामना २० जानेवारीला होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com