Roger Federer शेवटच्या सामन्यात झाला भावूक, नडाललाही अश्रू झाले अनावर

Roger Federe : रॉजर फेडररने गुरुवारी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. या सामन्यानंतर तो खूप भावूक झाला.
Roger Federer
Roger FedererDainik Gomantak

रॉजर फेडररने (Roger Federer) अखेर टेनिस कोर्टला निरोप दिला. शुक्रवारी लेव्हर कपमध्ये त्याचा जोडीदार राफेल नदालसोबत दुहेरीच्या सामन्यात पराभव झाला. यासह त्याची चमकदार कारकीर्दही संपुष्टात आली. या शेवटच्या सामन्यानंतर रॉजर फेडररला आपले अश्रू अनावर झाले. या भावनिक क्षणात राफेल नदालही भावूक झाल्या.

रॉजर फेडरर हा तिसरा सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा पुरुष टेनिसपटू आहे. गेल्या आठवड्यात त्याने टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली होती. दुखापत झाली असून सुध्दा त्याने लेव्हर कपमध्ये कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळण्याची घोषणा केली होती.

लेव्हर कपमध्ये (Laver Cup) तो टीम युरोपसाठी मैदानात उतरला होता. त्याचा जोडीदार स्पॅनिश दिग्गज राफेल नडाल होता. या जोडीने टीम वर्ल्ड जोडी फ्रान्सिस टिफॉय-जॅक सॉकचा पहिल्या सेटमध्ये पराभव केला पण पुढचे दोन सेट रोमहर्षक पद्धतीने गमावले. यासह फेडरर-नडाल जोडीच्या हातून सामनाही निसटला. पराभवानंतर फेडरर कोर्टवरच रडायला लागला.

Roger Federer
Rohit Sharma: T20 क्रिकेटमध्ये 'हिटमॅन' ने केला नवा विक्रम

लंडनच्या ब्लॅक कोर्टमध्ये फेडररला पाहण्यासाठी गर्दी झाली होती.  संपूर्ण सामन्यात दोन्ही संघ आणि टेनिस कोर्टवर उपस्थित असलेले चाहते फेडररच्या प्रत्येक शॉटचे कौतुक करताना दिसले.

सामना संपल्यानंतर टीम वर्ल्ड आणि टीम युरोपच्या खेळाडूंनी फेडररला खांद्यावर उचलून जल्लोष केला होता. लेव्हर कप आणि एटीपीच्या ट्विटर हँडलवरून फेडररच्या या शेवटच्या सामन्याशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com