ODI World Cup 2023: विश्वचषक 2023 चा सातवा सामना इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात धरमशाला येथे खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लिश फलंदाज डेव्हिड मलानने शानदार फलंदाजी करत एकदिवसीय कारकिर्दीतील सहावे शतक आणि विश्वचषक इतिहासातील पहिले शतक पूर्ण केले. 100 चेंडूत त्याने 127 धावा केल्या.
दरम्यान, धरमशालामध्ये झालेल्या या शतकासह मलानच्या नावावर एक खास विक्रमही नोंदवला गेला आहे. वनडे फॉरमॅटमध्ये सर्वात कमी डावात सहा शतके झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
त्याच्या आधी हा खास विक्रम पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हकच्या नावावर होता. त्याने 27 डावात सहा वनडे शतके झळकावली होती. तर मलानने अवघ्या 23 डावात ही खास कामगिरी केली आहे.
मलानने खास विक्रमांच्या बाबतीत केवळ इमाम-उल-हकच नाही तर पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमसह (Babar Azam) अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. बाबरला वनडे फॉरमॅटमध्ये सहा शतके पूर्ण करण्यासाठी 32 डावांचा सामना करावा लागला होता. त्याच्याशिवाय उपुल थरंगाने 29 डावांत आणि हाशिम आमलाने 34 डावांत हा खास विक्रम केला होता.
डेविड मलान – इंग्लंड – 23 डाव
इमाम उल हक – पाकिस्तान – 27 डाव
उपुल थरंगा – श्रीलंका – 29 डाव
बाबर आझम – पाकिस्तान (Pakistan) – 32 डाव
हाशिम आमला – दक्षिण आफ्रिका – 34 डाव
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.