World Cup 2023: वनडे वर्ल्ड कपमध्ये अनोखा रेकॉर्ड, नेदरलँड्सविरुद्ध न्यूझीलंड संघाची शानदार कामगिरी

World Cup 2023, NZ vs NED: एकदिवसीय विश्वचषकाचा इतिहास खूप जुना आहे, त्याची सुरुवात 1975 मध्ये झाली.
New Zealand Players
New Zealand PlayersDainik Gomantak
Published on
Updated on

World Cup 2023, NZ vs NED: एकदिवसीय विश्वचषकाचा इतिहास खूप जुना आहे, त्याची सुरुवात 1975 मध्ये झाली. पहिला एकदिवसीय विश्वचषक इंग्लंडने आयोजित केला होता. यावेळी एकदिवसीय विश्वचषकाचा 13 वा हंगाम भारतात होत आहे.

विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत संघ आणि त्यांच्या खेळाडूंनी अनेक विक्रम केले आहेत. असे अनेक विक्रम आहेत, जे क्रिकेट चाहत्यांना माहीत आहेत, पण काही विक्रम असे आहेत, ज्यांची माहिती फार कमी लोकांना आहे.

आम्ही तुम्हाला अशाच एका रेकॉर्डबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल तुम्हाला क्वचितच माहिती असेल.

दरम्यान, हा एकदिवसीय विश्वचषकातील विक्रम आहे, ज्यामध्ये संघाच्या 6 खेळाडूंनी एका सामन्यादरम्यान 30 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या यादीत पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजच्या संघांचा समावेश आहे.

न्यूझीलंडने (New Zealand) एकूण दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे. तर एकदिवसीय विश्वचषकात सहाव्यांदा ही कामगिरी झाली आहे. पाकिस्तानने 2019 मध्ये ही कामगिरी केली होती. आता न्यूझीलंड संघाने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात ही कामगिरी केली आहे.

New Zealand Players
World Cup 2023: शुभमन गिल दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही? BCCI कडूनच मिळाले महत्त्वाचे अपडेट्स

एकदिवसीय विश्वचषकाच्या एका डावात 30 प्लसची सर्वोच्च धावसंख्या

6 – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, 1987

6 – इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स, 2011

6 – न्यूझीलंड विरुद्ध कॅनडा, 2011

6 – वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान, 2015

6 – पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2019

6 – न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड, 2023

New Zealand Players
World Cup 2023: कमिन्सने जिंकला टॉस, गिलच्या जागेवर इशानला संधी; पाहा भारत-ऑस्ट्रेलियाची 'प्लेइंग-11'

पाकिस्तान संघाने हा पराक्रम दोनदा केला

पाकिस्तान (Pakistan) संघाने एकदिवसीय विश्वचषकादरम्यान दोनदा हा पराक्रम केला आहे, जेव्हा त्यांच्या 6 खेळाडूंनी एका सामन्यादरम्यान फलंदाजी करताना 30 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. 1987 च्या विश्वचषकात पाकिस्तानने पहिल्यांदा ही कामगिरी केली होती.

1987 मध्ये पाकिस्तान संघाच्या 6 खेळाडूंनी श्रीलंकेविरुद्ध फलंदाजी करताना 30-30 धावा केल्या होत्या. या सामन्यात रमीझ रझा 32, मन्सूर अख्तर 33, वसीम अक्रम 39, इजाज अहमद 30 आणि इम्रान खानने 39 धावा केल्या.

यानंतर पाकिस्तान संघाने 2019 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्यांदा ही कामगिरी केली होती. या सामन्यात पाकिस्तानकडून इमाम-उल-हक 53, बाबर आझम 30, मोहम्मद हाफीज 46, सरफराज 40, हसन अली 32 आणि वहाब रियाझने 45 धावांची खेळी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com