World Cup 2023 Final: भारतीय असूनही... ग्लेन मॅक्सवेलची पत्नी विनी रमन 'या' प्रकरणावर संतापली; ट्रोर्लसचा घेतला समाचार

World Cup 2023 Final: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला.
Glenn Maxwell & Wife Vini Raman
Glenn Maxwell & Wife Vini Raman Dainik Gomantak
Published on
Updated on

World Cup 2023 Final: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला. अशाप्रकारे भारत तिसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकू शकला नाही तर ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा ट्रॉफी जिंकली.

अहमदाबादच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला 241 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे ट्रॅव्हिस हेडचे शतक आणि मार्नस लॅब्युशेनच्या अर्धशतकाच्या जोरावर त्याने 43 षटकांत सहज गाठले. कांगारु अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने विजेतेपदाच्या लढाईत नाबाद 32 धावा काढल्या.

टीम इंडियाच्या (Team India) पराभवानंतर मॅक्सवेलची पत्नी विनी रमनला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. भारतीय वंशाची असूनही विनी ऑस्ट्रेलियाला सपोर्ट करत असल्याचे अनेक यूजर्सनी म्हटले. अनेकांनी तिला घृणास्पद मेसेज पाठवले. स्पर्धेदरम्यानही असभ्य कमेंट करण्यात आल्या.

दरम्यान, ऑस्ट्रेलिय चॅम्पियन बनल्यानंतर विनीने आता ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. ती म्हणाली की, 'भारतीय असूनही तुमचा ज्या देशाचा जन्म झाला त्या देशाचे समर्थन करु शकता.' विनीचा जन्म ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये झाला. ती ऑस्ट्रेलियातच लहानाची मोठी झाली. तिचे आणि मॅक्सवेलचे मार्च 2022 मध्ये लग्न झाले.

दोघांना एक मुलगाही आहे, त्याचे नाव लोगान असे आहे. विनीने सोमवारी इन्स्टाग्रामवर आपली पोस्ट शेअर केली. कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ''मेलबर्न - सिंगापूर - दिल्ली - धर्मशाला - अहमदाबाद - मुंबई - पुणे - कोलकाता - अहमदाबाद - सिंगापूर - मेलबर्न लोगानला आठवणार नाही अशी आयुष्यभराची यात्रा.''

Glenn Maxwell & Wife Vini Raman
World Cup 2023 Final: ''आमचा दिवस नव्हता...'' PM मोदींना पाहताच शमीला अश्रू अनावर

विनीने पोस्टच्या शेवटच्या स्लाइडमध्ये लिहिले की, ''हे सांगण्याची गरज आहे यावर माझा विश्वास बसत नाही. तुम्ही भारतीय असूनही तुमचा ज्या देशात जन्म झाला त्या देशाला पाठिंबा देऊ शकता. महत्त्वाचे म्हणजे, तुमचा पती, तुमच्या मुलाचा बाप ज्या संघासाठी खेळतो त्याला तुम्ही पाठिंबा देऊ शकता. सुटकेचा नि:श्वास टाका आणि तुमचा राग जगातील इतर महत्त्वाच्या समस्यांकडे वळवा.''

Glenn Maxwell & Wife Vini Raman
World Cup 2023 Final: ''आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत...'', टीम इंडियाच्या पराभवानंतर PM मोदींचे ट्वीट

दुसरीकडे, मॅक्सवेलने विश्वचषकात प्रभावी कामगिरी केली हे विशेष. त्याने 9 सामन्यात 66.66 च्या सरासरीने आणि 150.37 च्या स्ट्राईक रेटने 400 धावा जोडल्या. मॅक्सवेलने या स्पर्धेत दोन अतिशय संस्मरणीय खेळी खेळल्या. त्याने नेदरलँड्सविरुद्ध 40 चेंडूत शतक झळकावले, जे एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक आहे.

याशिवाय, मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध (Afghanistan) शानदार खेळी खेळून ऑस्ट्रेलियाला जिंकून दिले होते. त्याने या सामन्यात 126 चेंडूत झंझावाती द्विशतक झळकावले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com