David Warner: पाकिस्तानची एक चूक अन् वॉर्नरने केला विक्रम, आता पाँटिंगच्या सिंहासनावर लक्ष

Australia vs Pakistan: पाकिस्तानविरुद्ध सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात डेव्हिड वॉर्नरने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
David Warner
David WarnerAFP
Published on
Updated on

Australia vs Pakistan, 2nd Test at Melbourne, David Warner Record:

मंगळवारी (26 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे सुरु झाला आहे. हा बॉक्सिंग डे कसोटी सामना असून या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने मोठा पराक्रम केला आहे.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे सुरुवातीलाच मोठी विकेट मिळवण्याची पाकिस्तानला संधी देखील निर्माणही झाली होती.

तिसऱ्याच षटकात वॉर्नर 2 धावांवर खेळत असताना शाहिन शाह आफ्रिदीने एक शानदार चेंडू टाकला. त्या चेंडूने वॉर्नरच्या बॅटची कड घेतली आणि मागे गेला. यावेळी स्लीपमध्ये असलेल्या अब्दुल्ला शफिकने सोपा झेल सोडला.

याचा फायदा घेत वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी 90 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र, वॉर्नरला मोठी खेळी करता आली नाही. तो 83 चेंडूत 38 धावांवर बाद झाला. पण असे असले, तरी त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

David Warner
IND vs SA: प्लेइंग-11, गोलंदाजी अन् केएल राहुलचे यष्टीरक्षण; कसोटी मालिकेपूर्वी रोहितने मांडले 5 महत्त्वाचे मुद्दे

वॉर्नर आता ऑस्ट्रेलियाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. त्याने माजी कर्णधार स्टीव वॉ यांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. वॉर्नरच्या आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 371 सामन्यांतील 460 डावात 18515 धावा झाल्या आहेत.

तसेच स्टीव्ह वॉ यांनी 493 कसोटी सामन्यांत 548 डावात 18496 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्य ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये अव्वल क्रमांकावर रिकी पाँटिंग आहे. त्याने 560 सामन्यांमधील 668 डावांत 27483 धावा केल्या आहेत.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पाकिस्तानविरुद्ध सुरु असलेली कसोटी मालिका वॉर्नरची अखेरची आहे. या मालिकेनंतर वॉर्नर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. असे असले तरी तो वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये खेळणे कायम करणार आहे.

David Warner
SA vs IND: बॉक्सिंग डे टेस्ट रोहित-विराटसाठी ठरणार विक्रमी? धोनी, द्रविड, सेहवागचे मोडू शकतात 'हे' विक्रम

मेलबर्न कसोटीबद्दल सांगायचे झाले, तर वॉर्नरनंतर उस्मान ख्वाजाही 101 चेंडूत 42 धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतर मार्नस लॅब्युशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला, परंतु स्मिथ 75 चेंडूत 26 धावा करून बाद झाला.

यानंतर लॅब्युशेन आणि ट्रेविस हेडने पाकिस्तानला पहिल्या दिवशी यश मिळू दिले नाही. पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने 66 षटकात 3 बाद 187 धावा केल्या. लॅब्युशेन 44 धावांवर नाबाद आहे, तर हेड 9 धावांवर नाबाद आहे.

पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना हसन अली, अमीर जमाल आणि अघा सलमान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com