लाहोरमध्ये किंग डेव्हिड वॉर्नर अन् शाहीन शाह आफ्रिदीची 'भिडंत'

शाहीन आफ्रिदी थेट डेव्हिड वॉर्नरपर्यंत पोहोचला आणि दोघेही भांडणाच्या सुराने एकमेकांच्या जवळ आले.
Pak vs Aus
Pak vs AusDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तान (Pakistan) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील तिसरी कसोटी लाहोरमध्ये पाहायला मिळाला. पाकिस्तानने तिसऱ्या दिवशी खराब बॅटींग केली आणि अवघ्या 20 धावांतच त्यांनी शेवटचे सात विकेट्स ही गमावले. यानंतर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव सुरू केला तेव्हा डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Afridi) यांच्यामध्ये जबरदस्त सामना झाला. (David Warner and Shaheen Shah Afridi were seen making fun of each other in Lahore)

Pak vs Aus
चर्चिल ब्रदर्स संघ दबावाखाली

पाकिस्तानचा वेगवान बॉलर शाहीन शाह आफ्रिदी गोलंदाजी करत असताना डेव्हिड वॉर्नरने त्या चेंडूला डिफेंस केले. फॉलो-थ्रू पूर्ण केल्यानंतर शाहीन आफ्रिदी थेट डेव्हिड वॉर्नरपर्यंत पोहोचला आणि दोघेही भांडणाच्या सुराने एकमेकांच्या जवळ आले.

दोघेही एकमेकांकडे बघू लागले आणि नंतर एकमेकांची मस्करी करत पुढे डाव खेळायला गेले. मात्र या सिन मधील त्या दोघांचा हा क्लिक झालेला फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे. डेव्हिड वॉर्नर कमी उंचीचा आणि शाहीन शाह आफ्रिदी उंच असल्याने हे चित्र अधिकच रंजक दिसते आहे.

Pak vs Aus
सोहमच्या शतकामुळे गोवा सुस्थितीत

नुकताच असाच एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टीमचे टेम्बा बावुमा आणि मार्को जेन्सन समोरासमोर आले होते. बावुमा हा लहान उंचीचा खेळाडू आहे, तर जेन्सनची उंची 6 फुटांपेक्षा जास्तच आहे. आता वॉर्नर आणि शाहीन आफ्रिदीचा असाच एक फोटो नेटवरती व्हायरल झाला आहे.

लाहोरमधील तिसऱ्या कसोटीत एक अप्रतिम खेळ रंगला म्हणायला हरकत नाही. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 391 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात पाकिस्तानने पहिल्या डावात केवळ 268 धावा केल्या. विशेष म्हणजे पाकिस्तानची चौथी विकेट 248 धावांवर पडली आणि संघ 268 धावांवर ऑलआऊट झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com