चर्चिल ब्रदर्स संघ दबावाखाली

आय-लीग फुटबॉल स्पर्धेत ऐजॉलविरुद्ध पराभव टाळण्यासाठी चर्चिल ब्रदर्सची धडपड
Churchill Brothers News, Football Tournament News
Churchill Brothers News, Football Tournament NewsKishor Petkar
Published on
Updated on

पणजी : माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्ससाठी यावेळचा आय-लीग फुटबॉल मोसम खूपच निराशाजनक ठरला. पराभव आणि गुणतक्त्यातील बारावा क्रमांक यामुळे गोव्यातील संघ सध्या दबावाखाली आहे. या पार्श्वभूमीवर ऐजॉल एफसीविरुद्ध आणखी एक हार टाळण्यासाठी त्यांची धडपड असेल. (Efforts by Churchill Brothers to avoid defeat against Aizawl in I-League football tournament)

पश्चिम बंगालमधील (West Bengal) कल्याणी येथे गुरुवारी (ता. २४) चर्चिल ब्रदर्ससमोर ऐजॉल एफसीचे खडतर आव्हान असेल. ऐजॉल संघाला सध्या सूर गवसला आहे. सलग चार सामने गमावल्यानंतर या संघाने मागील दोन्ही सामने जिंकून सहा गुणांसह आठवा क्रमांक मिळविला. चर्चिल ब्रदर्सने चार सामने विजयाविना राहिल्यानंतर बलाढ्य मोहम्मेडन स्पोर्टिंगला (Mohammedan Sporting) हरवून अपेक्षा उंचावल्या, पण मागील लढतीत राजस्थान युनायटेडकडून (Rajasthan United) हार पत्करल्यामुळे त्यांच्या पदरी पुन्हा निराशा आली. दोन वेळा आय-लीग स्पर्धा (I-League tournament) जिंकलेल्या संघाच्या खात्यात सध्या सहा सामन्यांतून फक्त चार गुण आहे. स्पर्धेत त्यांनी चार लढती गमावल्या आहेत. (Churchill Brothers News)

संघ अगदीच वाईट खेळत नाही, तरीही अपेक्षित निकाल नोंदवू शकत नसल्यामुळे चर्चिल ब्रदर्सचे सहाय्यक प्रशिक्षक मातेस कॉस्ता नाराज आहेत. खेळाडूंनी पूर्ण क्षमतेने खेळणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी बुधवारी नोंदविले. ऐजॉलविरुद्धही पराभव झाल्यास चर्चिल ब्रदर्सला पदावनती टाळण्यासाठी गटात खेळावे लागेल याची जाणीव कॉस्ता यांना आहे.

Churchill Brothers News, Football Tournament News
सोहमच्या शतकामुळे गोवा सुस्थितीत

ऐजॉलने सलग दोन सामने जिंकले असले, तरी त्यांचे प्रशिक्षक यॅन लॉ चर्चिल ब्रदर्सला (Churchill Brothers) कमी लेखण्यास तयार नाहीत. चर्चिल ब्रदर्स संघ खूपच बलवान आहे आणि गुणतक्त्यातील कामगिरीवरून त्यांचा दर्जा सिद्ध होत नाही. ते खराब खेळत नाहीत, असे मत लॉ यांनी नोंदविले.

दोन्ही संघांची कामगिरी

- चर्चिल ब्रदर्स : ६ सामने, १ विजय, १ बरोबरी, ४ पराभव, ४ गुण

- ऐजॉल एफसी : ६ सामने, २ विजय, ४ पराभव, ६ गुण

- स्पर्धेत ऐजॉल एफसीचे ९, तर चर्चिल ब्रदर्सचे ४ गोल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com