NZ vs PAK: न्यूझीलंड संघात रचिन रविंद्रची एन्ट्री! पाकिस्तानविरुद्ध 'या' मॅचविनरच्या जागेवर खेळणार

Rachin Ravindra: पाकिस्तान विरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यासाठी रचिन रविंद्रचा न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे.
Rachin Ravindra
Rachin Ravindra
Published on
Updated on

Daryl Mitchell rested, Rachin Ravindra replace him for New Zealand vs Pakistan, fifth T20I Match :

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात सध्या 5 सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (20 जानेवारी) ख्राईस्टचर्चमध्ये होणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेटने एक मोठा निर्णय घेतला आहे.

वर्कलोडच्या विचार करता अष्टपैलू डॅरिल मिचेल अखेरच्या टी20 सामन्यातून बाहेर झाला असून त्याच्या जागेवर रचिन रविंद्रला संधी देण्यात आली आहे. रचिनला याआधी या मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती.

Rachin Ravindra
IND vs ENG: टीम इंडियाला मायदेशात रोखण्यासाठी इंग्लंड वापरणार 'ही' रणनीती, अँडरसनने दिले संकेत

न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी सांगितले की 'आम्ही निर्णय घेतला आहे की डॅरिल मिचेलला या सामन्यातून विश्रांती दिली आहे. आम्हाला काही महत्त्वाचे कसोटी सामने खेळायचे आहेत.'

'डॅरिल तिन्ही प्रकारात खेळणारा खेळाडू आहे. त्यामुळे त्याचा वर्कलोड सांभाळणे हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तो आमच्या मायदेशातील हंगामात महत्त्वाची भूमिका निभावणारा खेळाडू आहे. त्यामुळे ही मालिका आम्ही जिंकली असल्याने त्याला विश्रांती देण्याची संधी आहे.'

'तसेच पुन्हा रचिनला संघा आलेलं पाहून आनंद आहे. तो ही काही काळ विश्रांतीवर होता. त्याने पुनरागमन केले असून वेलिंग्टन फायरबर्डकडून एक सामना खेळला. त्याने जी भूमिका निभवावी असे आम्हाला वाटते, त्यात तो फिट बसतो.'

Rachin Ravindra
IND vs ENG: 'विराटमध्ये इगो, विशेषत: भारतात...', कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडच्या रॉबिन्सनने फुंकले रणशिंग

डॅरिल मिचेलने पाकिस्तानविरुद्धच्या चौथ्या सामन्यात 44 चेंडूत 72 धावांची खेळी केली होती. त्यामुळे तो या सामन्यात सामनावीरही ठरला होता.

कॉनवेच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

डेवॉन कॉनवेला कोविड-19 च्या लक्षणे आहेत. त्यामुळे त्याचे आरोग्य पाहून त्याला खेळवण्याचा निर्णय घेतला जाईल असे स्टेड यांनी सांगितले आहे.

दरम्यान, केन विलियम्सन यापूर्वीच हॅमस्ट्रिंगचा त्रास झाल्याने या मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे सध्या या मालिकेत मिचेल सँटेनर न्यूझीलंडचे नेतृत्व करत आहे.

न्यूझीलंडने जिंकली मालिका

न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध पहिल्या चारही सामन्यात विजय मिळवले आहेत. त्यामुळे न्यूझीलंडने 4-0 अशा फरकाने विजयी आघाडी घेतली आहे. आता पाचवा सामना जिंकून पाकिस्तानला व्हाइटवॉश देण्याची संधी न्यूझीलंडला आहे. दरम्यान, पाकिस्तानही प्रतिष्ठा राखण्यासाठी पाचव्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com