MS Dhoni: फुलांची उधळण अन् चाहत्यांची गर्दी...! लाडक्या थालाचं चेन्नईत जोरदार स्वागत; पाहा Video

MS Dhoni: नुकतेच एमएस धोनी आणि त्याची पत्नी साक्षी चेन्नईत पोहचले असून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
MS Dhoni
MS DhoniDainik Gomantak
Published on
Updated on

MS Dhoni with Wife Sakshi receive Grand Welcome in Chennai: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्याची एक झलक पाहाण्यासाठी चाहते उत्सुक असतात. याचा प्रत्येय पुन्हा एकदा नुकताच चेन्नईत धोनी पत्नी साक्षीसह पोहचल्यानंतर आला आहे.

मीडियातील रिपोर्ट्सनुसार चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार धोनी त्याच्या 'धोनी एंटरटेनमेंट' या प्रोडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट 'लेट्स गेट मॅरिड' च्या ऑडियो आणि ट्रेलर लाँचसाठी चेन्नईत पोहचला आहे.

लाँचिंगचा कार्यक्रम 10 जुलैला होणार आहे. या कार्यक्रमासाठी एमएस धोनी आणि साक्षीसह उपस्थित राहाणार आहे. या चित्रपटात हरिश कल्याण, इवाना, नाधिया, योगी बाबू, मिर्ची विजय असे कलाकार दिसणार आहेत.

MS Dhoni
HBD MS Dhoni: बर्थडे आहे माही भाईचा अन् जल्लोष साऱ्या क्रिकेटविश्वाचा! धोनीवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

दरम्यान, या लाँचसाठी धोनी चेन्नईत पोहोचला असताना विमानतळावर त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. या क्षणांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की धोनी आणि साक्षी विमानतळावरून बाहेर येताना सुरक्षा रक्षकांच्या घेऱ्यात आहेत. पण विमानतळावर धोनीची झलक पाहाण्यासाठी चाहत्यांची गर्दीही चमली असून ते त्याच्या नावाने चिअरही करत आहेत. तसेच यावेळी धोनी आणि साक्षी फुलांची उधळणही करण्यात आली.

धोनीने खास दोस्तांबरोबर साजरा केला वाढदिवस

दरम्यान, धोनीने चेन्नईत येण्यापूर्वी नुकताच शुक्रवारी (7 जुलै) त्याचा 42 वा वाढदिवस साजरा केला. त्याने त्याचा वाढदिवस रांचीमध्येच त्याच्या घरी साजरा केला. दरम्यान, त्याने त्याच्या पाळीव कुत्र्यांबरोबरही त्याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनचा व्हिडिओही धोनीने सोशल मीडियावर शेअर केला होता.

धोनीची त्याच्या पाळीव कुत्र्यांबरोबर चांगली गट्टी आहे. त्याचे अनेकदा त्यांच्याबरोबर मस्ती करतानाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.

MS Dhoni
MS Dhoni Birthday: धोनीचं आगळं-वेगळं सेलिब्रेशन, बर्थडे पार्टीची गँग खूपच स्पेशल; व्हिडिओ व्हायरल

धोनीच्या सीएसकने जिंकले आयपीएल

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने मे महिन्याच्या अखेरीस आयपीएल 2023 स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे. चेन्नईने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करत पाचव्यांदा आयपीएल 2023 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.

त्यामुळे आता सर्वाधिक आयपीएल विजेतेपद जिंकण्याच्या बाबतीत चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संयुक्तरिक्त्या अव्वल क्रमांकावर आले आहेत.

धोनीवर झाली शस्त्रक्रिया

एमएस धोनी आयपीएल 2023 च्या संपूर्ण हंगामात डाव्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता. त्यामुळे मुंबईतील कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये त्याच्या गुडघ्यावर डॉक्टर दिनशॉ परदीवाला यांनी शस्त्रक्रिया केली. सध्या धोनी या शस्त्रक्रियेतून सावरत आहे.

धोनीची कारकिर्द

धोनी भारताचा यशस्वी कर्णधारही असून त्याच्या नेतृत्वात भारताने 2007 टी20 वर्ल्डकप, 2011 वनडे वर्ल्डकप आणि 2013 चॅम्पिटन्स ट्रॉफी अशी तीन आयसीसी विजेतीपदे जिंकली आहेत.

धोनीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 526 सामने खेळले असून 44.96 च्या सरासरीने 11 शतके आणि 108 अर्धशतकांसह 17266 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने यष्टीरक्षक म्हणून 829 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच धोनीने आयपीएलमध्ये 250 सामने खेळले असून 38.79 सरासरीने आणि 135.92 स्ट्राईक रेटने 5082 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 24 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने यष्टीरक्षण करताना 180 विकेट्स (138 झेल आणि 42 यष्टीचीत) घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com