HBD MS Dhoni: बर्थडे आहे माही भाईचा अन् जल्लोष साऱ्या क्रिकेटविश्वाचा! धोनीवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

MS Dhoni Birthday: एमएस धोनीवर त्याच्या 42 व्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, पंतने तर केक कापून सेलिब्रेशन केले आहे.
MS Dhoni Birthday
MS Dhoni Birthday Dainik Gomantak

Cricket fraternity wishes MS Dhoni on his 42nd Birthday: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आज (7 जुलै 2023) त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला जगभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. यामध्ये अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंचाही समावेश आहे.

धोनीने त्याच्या कारकिर्दीत मोठे यश मिळवले आहे. त्यामुळे त्याचा चाहतावर्गही मोठा आहेत. भारतभरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या चाहत्यांनी त्याचा वाढदिवस खास करण्यासाठी विविध उपक्रमही राबवले आहेत.

याचदरम्यान धोनीला भारताच्या आजी-माजी खेळाडूंकडूनही विविध स्वरुपात शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. भारतीय संघात धोनीचा वारसदार म्हणून ओळखल्या गेलेल्या ऋषभ पंतने तर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत केक कापत भारतीय संघातील अनेक खेळाडूंच्या लाडक्या माही भाईचा वाढदिवस साजरा केला.

MS Dhoni Birthday
MS Dhoni: धोनी आणि अन्य कॅप्टन्समधील फरक काय? 12 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

तसेच जडेजानेही धोनीला त्याचा 'गो टू मॅन' म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने सातच्या आकड्याचे महत्त्व सांगत धोनीला शुभेच्छा दिल्या. युवराज सिंगने धोनीबरोबरचा जुना फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

धोनीचा मैदानाबाहेरही चांगला मित्र असलेल्या सुरेश रैनाने धोनीला मोठा भाऊ म्हणताना शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी त्याने असेही लिहिले की 'एकत्र खेळण्याबरोबर स्वप्नही आपण शेअर केले. जो बाँड आपण तयार केला, तो न तुटणारा आहे. एक कर्णधार आणि मित्र म्हणून तुझी ताकद माझ्यासाठी मार्ग दाखवणारा प्रकाश ठरला आहे. येणारे वर्ष तुला आनंदाचे, यशाचे आणि उत्तम आरोग्याचे जावो. नेतृत्व करत रहा आणि तुझी जादू पसरवत रहा.'

त्याचबरोबर अन्य काही क्रिकेटपटूंनीही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

MS Dhoni Birthday
MS Dhoni Video: धोनीला गल्लोगल्लीत पोहचवणारे ते अविस्मरणीय क्षण! एकदा पाहाच

भारताचा यशस्वी कर्णधार

धोनीला भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार समजले जाते. त्याच्या नेतृत्वात भारताने 2007 टी20 वर्ल्डकप, 2011 वनडे वर्ल्डकप आणि 2013 चॅम्पिटन्स ट्रॉफी अशी तीन आयसीसी विजेतीपदे जिंकली आहेत.

धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 526 सामने खेळले असून 44.96 च्या सरासरीने 11 शतके आणि 108 अर्धशतकांसह 17266 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने यष्टीरक्षक म्हणून 829 विकेट्स घेतल्या आहेत.

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक 5 विजेतीपदं जिंकणाराही कर्णधार आहे. धोनीने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 250 सामने खेळले असून 38.79 सरासरीने आणि 135.92 स्ट्राईक रेटने 5082 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 24 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने यष्टीरक्षण करताना 180 विकेट्स (138 झेल आणि 42 यष्टीचीत) घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com