MS Dhoni: 'ओह कॅप्टन, माय कॅप्टन!', CSK ने शेअर केलेल्या 33 सेंकदाच्या 'त्या' व्हिडिओने फॅन्स इमोशनल

Video: चेन्नई सुपर किंग्सने मंगळवारी धोनीचा एक इमोशनल व्हिडिओ शेअर केला होता.
MS Dhoni
MS DhoniDainik Gomantak

CSK Shares Emotional Video of MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आणि भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला मोठा चाहतावर्ग आहे. त्याला खेळताना पाहाण्यासाठी चाहते उत्सुक असतात. तो भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारही समजला जातो. अशातच त्याचा आयपीएलमधील संघ चेन्नई सुपर किंग्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे चाहते भावूक झाले आहेत.

धोनीने मे महिन्याच्या अखेरीस त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सला पाचवे आयपीएल विजेतेपद जिंकून दिले होते. दरम्यान, हा आयपीएल 2023 त्याचा अखेरचा हंगाम आहे का अशा अनेक चर्चा सुरू होत्या. मात्र धोनीने आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यानंतर तो पुढील हंगामातही खेळू शकतो, असे त्याने सांगितले होते.

MS Dhoni
MS Dhoni meet Mohammad Kaif: सर्जरीनंतर धोनीची कैफ फॅमिलीशी 'ग्रेट भेट'! जुन्या मित्राच्या मुलाला 'ती' गोष्ट सांगत केले खूश

सीएसकेने शेअर केला व्हिडिओ

दरम्यान, सीएसकेने 13 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता धोनीचा एक 33 सेंकदाचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तो स्टेडियमच्या पायऱ्या चढताना दिसत आहे. तसेच याचवेळी आयपीएल 2023 मधील त्याच्या संदर्भातील काही खास क्षणही दिसत आहेत.

या व्हिडिओला सीएसकेने 'ओह कॅप्टन, माय कॅप्टन', असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे धोनी आणि सीएसकेचे चाहते भावूक झाले आहेत. काही चाहत्यांनी तो निवृत्ती तर घेत नाही ना, असे प्रश्नही विचारले आहेत.

धोनीने यापूर्वीच 15 ऑगस्ट 2020 रोजी इंस्टाग्रामवर अचानक कोणाच्याही ध्यानीमनी नसताना पोस्ट शेअर करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तसेच त्यापूर्वी त्याने 2014 सालच्या अखेरीस अचानक कसोटीतून निवृत्ती घेतलेली, तर 2016 च्या अखेरीस त्याने अचानक वनडे कर्णधारपद सोडले होते.

त्याच्या याच गोष्टींमुळे चाहत्यांनी सीएसकेने शेअर केलेल्या त्या व्हिडिओनंतर तो आयपीएलमधूनही निवृत्त होत आहे का? अशी भिती व्यक्त केली होती.

MS Dhoni
MS Dhoni tips to KS Bharat: WTC फायनलसाठी केएस भरतला धोनीने काय दिल्या टीप्स? स्वत:च केलाय खुलासा

धोनीची झाली गुडघ्याची शस्त्रक्रिया

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आयपीएल 2023 स्पर्धा धोनी दुखऱ्या गुडघ्याने खेळला होता. पण ही संपल्यानंतर लगेचच मुंबईत त्याने त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घेतली. दरम्यान, आता या शस्त्रक्रियेनंतर धोनी पुन्हा आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसणार का? या प्रश्नाचे उत्तर मात्र अद्याप गुलदस्त्या आहे.

धोनीची कामगिरी

धोनीने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 250 सामने खेळले असून 38.79 सरासरीने आणि 135.92 स्ट्राईक रेटने 5082 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 24 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने यष्टीरक्षण करताना 180 विकेट्स (138 झेल आणि 42 यष्टीचीत) घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com