Video: 'आमच्या क्षेत्रात घुसला आता...' क्रिकेटर्स अन् अ‍ॅक्टर्समध्ये 'ओपन चॅलेंज'! नक्की काय भानगड?

गेल्या काही दिवसांपासून थ्री इडियट्सच्या सिक्वेलची चर्चा रंगली होती, पण आता सत्य बाहेर आलं असून क्रिकेटर्स अन् अ‍ॅक्टर्समध्ये टक्कर होणार आहे.
Cricketers vs Actors
Cricketers vs ActorsDainik Gomantak

Cricketers vs Actors New Ad: क्रिकेट चाहत्यांना सध्या इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचे वेध लागले आहेत. आयपीएलच्या या 16 व्या हंगामाला येत्या 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. असे असतानाच एक व्हिडिओ समोर आला आहे, या व्हिडिओमध्ये अनेक भारतीय क्रिकेटपटूंबरोबरच भारतीय अभिनेते अमीर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी दिसून येत आहेत.

अमीर, आर माधवन आणि शर्मन या तिघांनीही 'थ्री इडियट्स' या हिट चित्रपटात एकत्र काम केले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसात या तिघांचाही फोटो आणि काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामुळे 'थ्री इडियट्स'चा सिक्वेल येणार आहे का की काही वेगळा प्रोजेक्ट सुरू होणार आहे, याबद्दल चर्चा झाल्या होत्या. पण अखेर या व्हायरल फोटो आणि व्हिडिओ मागील खरे कारण समोर आले आहे.

Cricketers vs Actors
Aamir Khan : आमिर खानला आता केजीएफच्या दिग्दर्शकाचा आधार..पुढचा चित्रपट सोबत करणार

खरंतर हे तिघे ड्रिम 11 च्या एका जाहिरातीसाठी एकत्र आले होते आणि व्हायरल झालेला फोटोही या जाहीरातीमधीलच आहे. ही जाहिरात आता अधिकृतरित्या प्रदर्शित करण्यात अली असून अगदी कमी कालावधीत व्हायरल झाली आहे. या जाहीरातीत अमीर, आर माधवन आणि शर्मन यांच्याबरोबर भारतीय क्रिकेटपटूही दिसतात.

काय आहे जाहीरात?

अमीर, आर माधवन आणि शर्मन एक पत्रकार परिषद घेत आहेत. त्यावेळी पत्रकार परिषदेला सुरुवात होण्यासाठी पत्रकारांमध्ये 'थ्री इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल चर्चा सुरू आहे. पण नंतर अमीर, आर माधवन आणि शर्मन हे एक एक करून बोलायला लागतात. यावेळी ते क्रिकेटपटूंची खिल्लीही उडवताना दिसतात. पण त्यांच्या विधानांवर क्रिकेटपटूही गमतीशीर प्रतिक्रिया देतात.

Cricketers vs Actors
IPL 2023 पूर्वी जड्डू अन् कॅप्टनकूलची दिसली 'दोस्ती'! फॅन्सचं मन जिंकणारा Video व्हायरल

अमीर, आर माधवन आणि शर्मन म्हणतात की 'आम्हाला माहित आहे की तुम्ही लोक काय विचार करत आहात की आम्ही क्रिकेटपटूंच्या ड्रेसमध्ये काय करत आहोत. पण कसं आहे ना की क्रिकेटपटू जरा जास्तच ऍक्टिंग करायला लागले आहेत. जेव्हाही टीव्ही लावला की ते मी हे करतो आणि ते करतो म्हणताना दिसतात.'

'म्हणून आम्ही विचार केला ते ऍक्टिंगमध्ये बिझी आहेत, आम्ही क्रिकेट खेळतो. जाहिरातीत ऍक्टिंग करून कोणी ऍक्टर होत नाही. याचे चित्रपट 300 कोटींची कमाई करतात, तरी ऍक्टिंग त्यांच्याकडून करू घेत आहेत. ते आमच्या क्षेत्रात घुसत आहेत, आता आम्ही त्यांच्या क्षेत्रात घुसणार. ओपन चॅलेंज आहे.'

अभिनेत्यांच्या या विधानांवर रोहित शर्मा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर असे काही क्रिकेटपटू विविध प्रतिक्रिया देत आहेत. ते प्रतिक्रिया देताना असेही म्हणतात 'लगानमध्ये क्रिकेट खेळून कोणी क्रिकेटपटू नाही बनत. 300 कोटींची कमाई सोडा, 150 किमी च्या वेगाच्या चेंडूचा सामना करू शकतात का?'

'दोन वर्षात एक हिट चित्रपट देऊन कोणी हिटमॅन नाही बनत. एका बाऊंसरनेच जमीनीवर येतील. बोलायला पैसे नाही लागत. आम्हाला आव्हान स्विकार आहे, मैदानात भेटू.'

दरम्यान, या जाहीरातीवर क्रिकेट चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहे. काहींनी जाहीरातीचे कौतुक केले आहे, तर काहींनी मीम्सही शेअर केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com