IPL 2023 पूर्वी जड्डू अन् कॅप्टनकूलची दिसली 'दोस्ती'! फॅन्सचं मन जिंकणारा Video व्हायरल

CSK: आयपीएल 2023 साठी रविंद्र जडेजा सीएसके संघात दाखल झाला असून त्याचा एमएस धोनीबरोबरचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
MS Dhoni | Ravindra Jadeja
MS Dhoni | Ravindra Jadeja Dainik Gomantak
Published on
Updated on

MS Dhoni and Ravindra Jadeja Friendship Video: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी आत आठवड्याभराचाच कालावधी राहिला आहे. त्यामुळे चाहत्यांना आयपीएलच्या या 16 व्या हंगामाचे वेध लागले आहेत. अशातच आता प्रत्येक संघ एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाही चेन्नई सुपर किंग्स संघात गुरुवारी दाखल झाला आहे.

धोनी - जडेजाचा व्हिडिओ व्हायरल

जडेजा आयपीएल 2023 स्पर्धेसाठी सीएसके संघात दाखल झाल्यानंतर संघातील अन्य खेळाडूंनाही भेटला. तसेच सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीलाही तो भेटला. या दोघांचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

जडेजा सीएसके संघात दाखल झाल्यानंतर एका सराव सत्रानंतर धोनीबरोबर चर्चा करताना दिसले. यावेळी हे दोघेही हलक-फुलकी चर्चा करत असल्याचे व्हिडिओतून दिसून येत आहे, कारण या चर्चेदरम्यान ते खळखळून हसताना आणि मस्तीच्या मूडमध्ये दिसत होते. या दोघांच्या या व्हिडिओवर सध्या चाहत्यांकडून मोठी प्रमाणात पसंती मिळत आहे.

MS Dhoni | Ravindra Jadeja
MS Dhoni: चेन्नईच्या स्टेडियममधील नव्या स्टँडचं उद्घाटन, लाडक्या थालाचीही उपस्थिती, पाहा Video

जडेजा नुकताच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी आणि वनडे मालिकेत खेळला आहे. या मालिकांमधून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. तो या मालिकांपूर्वी 5 महिने दुखापतींमुळे क्रिकेटपासून दूर होता. पण त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दणक्यात पुनरागमन केले. त्याने कसोटीत मालिकावीराचा पुरस्कारही जिंकला. तसेच वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता. या मालिकांनंतर आता तो आयपीएल खेळण्यासाठीही सज्ज आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी आयपीएलच्या 15 व्या हंगामापूर्वी धोनीने जडेजाकडे सीएसकेचे नेतृत्व सोपवले होते. पण हा हंगाम मध्यावर असताना जडेजाने हे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धोनीने पुन्हा ही जबाबदारी सांभाळली.

यादरम्यान, जडेजाचे आणि सीएसके फ्रँचायझीमध्ये वाद झाल्याचीही चर्चा होती. मात्र, जडेजा आयपीएल 2023 हंगामासाठी सीएककेकडून खेळण्यास पूर्ण सज्ज असल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

जडेजाच्या सर टोपननावामागे धोनीचा हात

अनेकदा जडेजाला सर या टोपननावानेही ओळखले जाते. पण त्याला हे नाव धोनीने दिले आहे. साल 2013 मध्ये धोनीने सलग काही ट्वीट केले होते. यामध्ये त्याने जडेजाबद्दल काल्पनिक गोष्टी लिहिताना सर असा त्याचा उच्चार केला होता. तेव्हापासून जडेजाला सर हे टोपननाव मिळाले.

MS Dhoni | Ravindra Jadeja
MS Dhoni: 'त्यावेळी धोनी उठला, बोलला अन् इमोशनल झाला', वॉटसनने सांगितली CSK संघातील स्पेशल आठवण

सीएसकेकडे अष्टपैलू खेळाडूंची फौज

सीएसकेने आयपीएल 2023 हंगामाची तयारी जवळपास गेल्या तीन-चार आठवड्यांपासूनच सुरू केली असून चेन्नईत संघाचे सराव शिबिरही आयोजित करण्यात आले होते. या सराव शिबिरात धोनीसह सीएसकेचे अनेक खेळाडू सहभागी झाले होते.

आता आयपीएलला आठवडाच राहिला असताना संघात परदेशी खेळाडूंनीही हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यंदा 16 कोटींहून अधिकच्या रकमेत खरेदी केलेला बेन स्टोक्सही संघात दाखल झाला असून त्याच्यासह मोईन अली देखील आला आहे.

यंदा सीएसके संघात अनेक चांगले अष्टपैलू खेळाडू खेळताना दिसू शकतात. जडेजा, स्टोक्स, मोईन, यांच्याबरोबरच संघात शिवम दुबे, राजवर्धन हंगारगेकर, ड्वेन प्रीटोरियस, मिचेल सँटेनर असे अष्टपैलू खेळाडूही आहेत.

सीएसके यंदा त्यांचा पहिला सामना गुजरात टायटन्सविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 31 मार्च रोजी खेळणार आहे. हा आयपीएल 2023 हंगामातील पहिलाच सामनाही असून या सामन्याने या हंगामाची सुरुवात होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com