FC Goa In ISL: एफसी गोवा संघावर संतापले प्रशिक्षक; निराशाजनक कामगिरीवर मार्केझ यांची तीव्र नाराजी

पंजाब एफसीवर मिळवला होता निसटता विजय
FC Goa Coach Manolo Márquez
FC Goa Coach Manolo MárquezDainik Gomantak
Published on
Updated on

FC Goa In Indian Super League: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या पंजाब एफसीवर अनुभवी एफसी गोवाने एका गोलने निसटता विजय नोंदवून पूर्ण तीन गुणांची कमाई केली, पण मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ संघाच्या एकंदरीत निराशाजनक कामगिरीने नाराज असून त्यांनी तीव्र संतापही व्यक्त केला.

एफसी गोवाने सोमवारी रात्री फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर स्पर्धेच्या दहाव्या मोसमातील मोहिमेची सुरवात विजयाने केली. 17व्या मिनिटास स्पॅनिश कार्लोस मार्टिनेझ याने केलेला गोल निर्णायक ठरला.

सामन्यावर वर्चस्व राखून एफसी गोवाने गोल करण्याच्या कित्येक संधी दवडल्या, तसेच उत्तरार्धात पंजाबचा गोल ऑफसाईड ठरल्यामुळे यजमान संघ बचावला.

FC Goa Coach Manolo Márquez
37th National Games: राष्ट्रीय स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू; 3000 हून अधिक स्वयंसेवक तैनात करणार...

कामगिरीवर नाखुषी

सामन्यानंतर मार्केझ म्हणाले, ``आम्ही सामने जिंकलो ही चांगली गोष्ट ठरली, पण संघाच्या एकंदरीत कामगिरीवर मी खूष नाही.`` एफसी गोवाने सामन्यात क्लीन शीट राखली, परंतु मोठ्या फरकाने संघ जिंकू शकला नाही ही बाब मार्केझ यांना सलत आहे.

``तुलनेत प्रतिस्पर्ध्यांनी चांगल्या संधी निर्माण केल्या. बचावफळीत आम्ही चांगले खेळलो. एकंदरीत कामगिरीवर मी रागावलो आहे,`` असे मार्केझ पुढे म्हणाले. एफसी गोवाचा स्पर्धेतील पुढील सामना फातोर्डा येथेच शनिवारी (ता. 7) ओडिशा एफसीविरुद्ध होईल. ओडिशाने दोन लढतीतून चार गुणांची कमाई केली आहे.

FC Goa Coach Manolo Márquez
Asian Games: पारुलची सुवर्ण धाव! सलग दुसरं मेडल जिंकत उंचावली भारताची मान

तर पराभवाचाही धोका

एफसी गोवा संघ सामने जिंकू शकेल, पण असाच खेळ केला तर संघ पराभूतही होऊ शकतो. संघात चढउतार कायम राहिले, तर चांगल्या मोसमाची अपेक्षा बाळगणे कठीण ठरेल.

संघात आम्हाला आणखी चांगला समतोल साधावा लागेल, तसेच चांगल्या निकालांसाठी सुधारणा आणि मेहनतीची गरज असल्याचे मतही मार्केझ यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com