Asian Games: पारुलची सुवर्ण धाव! सलग दुसरं मेडल जिंकत उंचावली भारताची मान

Parul Chaudhary: भारताची धावपटू पारुल चौधरीने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली असून तिचे हे स्पर्धेतील दुसरे पदक आहे.
Parul Chaudhary
Parul ChaudharyDainik Gomantak

India's runner Parul Chaudhary win gold Medal in women's 5000m final at 19th Asian Games Hangzhou:

भारताची 28 वर्षीय धावपटू पारुल चौधरीने चीनमध्ये सुरू असलेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी (3 ऑक्टोबर) सुवर्ण पदक जिंकण्याचा कारनामा केला. तिने मंगळवारी महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. पारुलचे हे या स्पर्धेतील दुसरे पदक आहे.

पारुलने मंगळवारी 5000 मीटर शर्यतीत पिछाडीवरून शानदार पुनरागमन केले होते. तिच्यासाठी आदल्या दिवशी 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी या शर्यतीत पळणे सोपे नव्हते, मात्र तिने जिद्द दाखवत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

Parul Chaudhary
Asian Games 2023: जयस्वालच्या धमाक्यानंतर गोलंदाजांनीही दाखवली चमक! टीम इंडिया सेमी-फायनलमध्ये

पारुलने 5000 मीटर शर्यतीतील अंतिम फेरीत सुरुवात धीम्या गतीने केली होती. 10 लॅपच्या या शर्यतीत सुरुवातीला फार पुढे नव्हती. मात्र, अखेरच्या तीन लॅपमध्ये तिने गती घेतली आणि ती सुरुवातीपासून पहिल्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या रिरिका हिरोनाकाच्याही जवळ आली. पण तरी रिरिका तिच्या पुढे होती.

मात्र, अखेरच्या काही क्षणा साधारण 25 मीटर अंतर बाकी असतानाच पारुलने तिला मागे टाकत ही शर्यत जिंकली. पारुलने 15:14.75 सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

रिरिका 15:15.34 वेळ नोंदवत दुसऱ्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे त्याने रौप्य पदक जिंकले. तसेच या शर्यतीत कझाकिस्तानची कॅरोलिन चेपकोच किपकिरुई 15:23.12 सेकंद वेळ नोंदवत कांस्य पदक जिंकले.

Parul Chaudhary
Asian Games: 'पदक जिंकताच...', नंदिनीचे स्वप्ना बर्मनने केलेल्या ट्रान्सजेंडरच्या आरोपावर प्रत्युत्तर

दरम्यान, पारुलने सोमवारी महिलांच्या 3000 मीटर स्टिपलचेसमध्ये 9:27:63 सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले होते. त्यामुळे तिने सलग दोन दिवसात दोन पदके जिंकण्याचा कारनामा केला आहे.

त्याचबरोबर सोमवारी महिलांच्या 3000 मीटर स्टिपलचेसमध्ये पारुलबरोबरच भारताच्याच प्रीती लांबाने 9:43.32 सेकंद वेळ नोंदवत कांस्य पदक जिंकले. या शर्यतीत बहारिनच्या यावी विन्फ्रेड मुतिलेने 9:18.28 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले होते.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की पारुलने यापूर्वीच 3000 मीटर स्टिपलचेससाठी पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता मिळवली आहे. तिने वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेवेळी ही पात्रता मिळवली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com