37th National Games: राष्ट्रीय स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू; 3000 हून अधिक स्वयंसेवक तैनात करणार...

आयोजन समितीला उच्च शिक्षण संचालनालयाचे सहकार्य
37th National Games Goa
37th National Games Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

37th National Games: गोव्यात होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात राज्यातील तीन हजाराहून जास्त स्वयंसेवक वाटा उचलणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धा आयोजन समितीने (एनजीओसी) संबंधित नोंदणी प्रक्रिया सुरू केली असून राज्य उच्च शिक्षण संचालनालयाचे त्यांना सहकार्य लाभणार आहे.

37th National Games Goa
Asian Games: पारुलची सुवर्ण धाव! सलग दुसरं मेडल जिंकत उंचावली भारताची मान

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेले स्वयंसेवक राज्यभरात स्पर्धा केंद्रांवर तैनात केले जातील. स्पर्धेसाठी इच्छुक स्वयंसेवक https://37nationalgamesgoa.in या संकेतस्थळावर नोंदणी करू शकेल. निवड झालेल्या स्वयंसेवकांना गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली काम करावे लागेल.

स्पर्धेचे 25 ऑक्टोबरला उदघाटन होईल, तर 9 ऑक्टोबरला समारोप होईल. त्यापूर्वी 19 ऑक्टोबरपासून बॅडमिंटन, तर 22 ऑक्टोबरपासून नेटबॉल खेळांचे सामने खेळले जातील. स्पर्धेत सर्वाधिक 43 खेळांचा समावेश असून मल्लखांब, कलारीपायाट्टू, गतका, लगोरी, योग या पारंपरिक देशी खेळांची चुरसही स्पर्धेत अनुभवण्यास मिळेल.

स्पर्धेतील सामन्यांसाठी राज्यभरात एकूण 28 केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. स्पर्धेत सर्व खेळांत मिळून देशभरातील आठ हजाराहून क्रीडापटू भाग घेतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

CM Pramod Sawant Water Metro Presentation
Goa Tourism
Calangute traffic cell electricity cut unpaid bill Goa
Canacona National Highway accidents
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com