I League Football: चर्चिल ब्रदर्सचा पाँईन्ट गोल; सलग दोन पराभवानंतर मुंबई विरोधात उघडले खाते

सामन्याच्या सहाव्याच मिनिटास अजफर नूरानी याच्या गोलमुळे मुंबई केंकरे संघाने आघाडी प्राप्त केली.
I League Football
I League FootballDainik Gomantak
Published on
Updated on

आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील (I League Football) सलग दोन पराभवानंतर गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सने (Churchill Brothers) पहिल्या गुणाची कमाई केली. सामन्यातील सहा मिनिटे बाकी असताना गोल नोंदवत त्यांनी मुंबई केंकरे एफसीला (Mumbai Kenkre FC) 1-1 असे गोलबरोबरीत रोखले.

(Churchill Brothers share spoils with Mumbai Kenkre FC to score first point)

I League Football
Mopa Airport: काम अपूर्ण उद्धाटनाची घाई, मोपावरील उड्डाणसाठी करावी लागणार प्रतिक्षा

सामना गुरुवारी मुंबई येथील कुपरेज मैदानावर झाला. सामन्याच्या सहाव्याच मिनिटास अजफर नूरानी याच्या गोलमुळे मुंबई केंकरे संघाने आघाडी प्राप्त केली. चर्चिल ब्रदर्सची वाटचाल आणखी एका पराभवाच्या दिशेने असताना लाल्खॉपुईमाविया याने 84व्या मिनिटास दोन वेळच्या माजी विजेत्यांना बरोबरी साधून दिली. त्याचा हा सलग दुसऱ्या सामन्यातील गोल ठरला.

मुंबई केंकरे एफसीचे आता तीन लढतीतून चार गुण झाले आहेत. तेवढेच सामने खेळलेल्या चर्चिल ब्रदर्सचा फक्त एक गुण आहे. त्यांचा पुढील सामना रियल काश्मीरविरुद्ध होईल. घरच्या मैदानावर बांबोळी येथील चर्चिल ब्रदर्सला अगोदरच्या लढतीत राजस्थान युनायटेड व श्रीनिदी डेक्कन संघाकडून हार पत्करावी लागली होती.

I League Football
Govt Job In Goa: गोव्यात सरकारी नोकरीची संधी, मोपा विमानतळावर मेगाभरती

श्रीनिदी डेक्कनचा सलग दुसरा विजय

आय-लीग स्पर्धेत गुरुवारी हैदराबाद येथे झालेल्या आणखी एका सामन्यात श्रीनिदी डेक्कन संघाने ट्राऊ (टिड्डिम रोड ॲथलेटिक युनियन) एफसीवर 1-0 फरकाने मात केली. डेव्हिड मुनोझ याने 41 व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे श्रीनिदी डेक्कनला सलग दुसरा विजय नोंदविता आला. तीन सामन्यांनंतर त्यांचे आता सहा गुण झाले आहेत. ट्राऊ एफसीचा हा पहिला पराभव ठरला, त्यामुळे तीन लढती खेळल्यानंतर त्यांचे चार गुण कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com