गोव्यात उभारण्यात आलेल्या दुसऱ्या विमानतळाचे लवकरच उद्घाटन होणार आहे. उत्तर गोव्यात मोपा विमानतळाच्या उद्धाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. गोव्यातील नियोजित आयुर्वेद काँग्रेसला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार असून, याचवेळी मोपाचे उद्धाटन होणार असल्याचे सांगितले जात आहे. पण, विमानतळाचे उद्धाटन झाले तरी काम अपूर्ण असून, विमानतळावरील विमान उड्डाणासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोपा विमानतळाचे 11 डिसेंबर रोजी उद्धाटन केले जाणार आहे. मात्र, विमानतळाचे उद्धाटन झाले तरी, विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित व्हायला वेळ लागणार आहे. त्यामुळे उद्घाटनानंतरी मोपावरील विमान उड्डाणसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. मोपा विमानतळ अद्याप प्रवासी आणि कमर्शिअल विमानासाठी तयार नाही. विमानतळाची अनेक कामे शिल्लक असल्याने विमान उड्डाणासाठी एक महिन्याचा अवधी लागू शकतो.
विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक आणि वायू वाहतूक संबधिक काम Operation Readiness and Airport Transfer (ORAT) अद्याप अपूर्ण आहे. तसेच, विमानतळासाठी आवश्यक कर्मचारी वर्ग अद्याप तयार नसून, त्यांना प्रशिक्षण आणि इतर बाबी देखील झालेल्या नाहीत. विमानतळावरील माहिती फलक, अग्निशमन सुविधा, दरवाजे आणि इतर सुरक्षा साधने यांची देखील तयारी अपूर्ण आहे.
गोवा, गृहखात्याने मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेसाठी पोलीस ठाणे (Mopa Police Sattion) आणि वाहतूक नियोजनासाठी वाहतूक शाखेच्या पदभरतीचे आदेश दिले आहेत. गृहखात्याने पोलीस ठाण्यासाठी 43 पोलीस कर्मचारी आणि वाहतूक शाखेसाठी (Mopa Traffic Cell) 21 जणांची तातडीने पदभरती करण्याचे आदेश दिले आहेत. या पदभरतीला देखील एक ते दोन महिन्यांचा अवधी लागू शकतो.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात 8-11 डिसेंबर या काळात होणाऱ्या आयुर्वेद काँग्रेसला उपस्थित राहणार आहेत. याच काळात 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान विमानतळाचे उद्धाटन करतील अशी माहिती राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.