Govt Job In Goa: गोव्यात सरकारी नोकरीची संधी, मोपा विमानतळावर मेगाभरती

गोवा गृह खात्याने मोपा विमानतळाच्या पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखेसाठी भरतीचे आदेश
Mopa International Airport, Goa
Mopa International Airport, GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात नव्यानं झालेल्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Mopa International Airport, Goa) उद्धाटन 11 डिसेंबरला होण्याची शक्यता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, विमानतळाच्या उद्धाटनासाठी घाई केली जात असताना आता गृहखात्याने विमानतळाच्या पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखेसाठी भरतीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गोमन्तकीयांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.

(Home department of goa issues order for mopa airport police sation and traffic cell)

Mopa International Airport, Goa
Fake Call Centre In Goa: गोव्यात फेक कॉल सेंटर; गुजरात, नागालँड येथील सहा जणांना अटक

गोवा, गृहखात्याने मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेसाठी पोलीस ठाणे (Mopa Police Sattion) आणि वाहतूक नियोजनासाठी वाहतूक शाखेच्या पदभरतीचे आदेश दिले आहेत. गृहखात्याने पोलीस ठाण्यासाठी 43 पोलीस कर्मचारी आणि वाहतूक शाखेसाठी (Mopa Traffic Cell) 21 जणांची तातडीने पदभरती करण्याचे आदेश दिले आहेत.

Mopa International Airport, Goa
IFFI Goa: कला अकादमी फक्त नावालाच; अपुऱ्या स्क्रीन व विक्रमी नोंदणीमुळे इफ्फीचं नियोजन गंडलं

दरम्यान, मोपा विमानतळाचे उद्धाटन करण्यासाठी गोवा सरकार घाई करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. विमानतळाचे काम पूर्ण झाले नाही तरी मुख्यमंत्री सावंत यांना विमानतळाचे उद्घाटनासाठी घाई करत आहेत. असे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला होता.

तसेच, मोपा विमानतळाच्या नामकरणासाठी देखील मदभेद सुरू आहेत. विमानतळासाठी भाऊसाहेब बांदोडकर, जॅक सिक्वेरा आणि मनोहर पर्रीकर यांच्या नावाची मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com