Gautam Gambhir: 'आदर्श काळजीपूर्वक निवडा', गंभीरची पान-मसालाची जाहिरात करणाऱ्या क्रिकेटर्सवर आगपाखड

'आदर्श काळजीपूर्वक निवडा', गंभीरची पान-मसालाची जाहिरात करणाऱ्या क्रिकेटर्सवर आगपाखड
Gautam Gambhir
Gautam GambhirDainik Gomantak

Gautam Gambhir slams cricketers who endorsing pan masala: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा दिल्लीतील खासदार गौतम गंभीरने आपल्यात संघसहकाऱ्यांवर आणि माजी क्रिकेटपटूंवर परखड शब्दात टीका केली आहे. काही क्रिकेटपटू, जे सरोगेट उत्पादनांद्वारे पान मसाला उत्पादनांची जाहिरात करत आहेत, त्यांच्यावर गंभीरने निशाणा साधला आहे.

काही दिवसांपूर्वीच संपलेल्या आयपीएलदरम्यान दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर, कपिल देव, विरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल यांसारखे खेळाडू एका पान मसाला कंपनीने बनवलेल्या माऊथ फ्रेशनर 'सिल्व्हर-कोटेड इलायची'ची जाहिरात करताना दिसले होते.

Gautam Gambhir
Gautam Gambhir: 'भारतात संघापेक्षाही एकाच खेळाडूला अधिक महत्त्व, म्हणूनच ICC ट्रॉफी...' गौतम गंभीर बरसला

याबद्दल टीका करताना गंभीर न्यूज18 ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, 'मी माझ्या आयुष्यात कधीही विचार केला नव्हता की एक क्रिकेटपटू पान मसालाची जाहिरात करेल. हे खूप निराशाजनक आहे. म्हणूनच मी म्हणतो, तुमचे आदर्श काळजीपूर्वक निवडा. तुम्ही काय उदाहरण समोर ठेवत आहात? एखाद्याची ओळख ही त्याच्या नावापेक्षा, त्याच्या कामाने अधिक होते.'

दरम्यान, गंभीरने ही टीका करताना किंवा याबद्दल प्रश्न विचारताना कोणत्याही क्रिकेटपटूचे नाव घेण्यात आले नव्हते.

'कोट्यवधी लहान मुलेही तुम्हाला पाहात आहेत. पैसे इतकेही महत्त्वाचे नाही की तुम्ही पान मसालाची जाहिरात कराल. पैसे कमावण्याचे अनेक वेगळे मार्ग आहेत. तुमच्याकडे एवढे धैर्य पाहिजे की तुम्ही अशा गोष्टी करण्यापेक्षा मोठ्या रकमेच्या चेकला नाही म्हणाल.'

Gautam Gambhir
Gautam Gambhir: विराट अन् धोनीबरोबर नाते कसे? गंभीरचा मोठा खुलासा; नवीनला पाठिंबा देण्याचं कारणंही सांगितलं

दरम्यान, गंभीरने असेही सांगितले की 2018 मध्ये, जेव्हा त्याने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व सोडले होते, तेव्हा त्याला पान मसालाची जाहिरात करण्यासाठी 3 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. पण त्याने त्याच्या तत्वांमुळे या गोष्टीला नकार दिला आहे. तसेच त्याने याबद्दल सचिन तेंडुलकरचेही उदाहरण दिले.

गंभीर म्हणाला, 'मी ते पैसे घेऊ शकलो असतो, पण मी त्याला जाऊ दिले कारण माझा नेहमीच या गोष्टीवर विश्वास राहिला आहे की मी ज्यासाठी पात्र आहे, ते मला मिळाले पाहिजे. सचिन तेंडुलकरला सुद्धा पान मसालाच्या जाहिरातीसाठी 20-30 कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. पण त्याने त्यासाठी नकार दिला. त्याने त्याच्या वडिलांना वचन दिले होते की तो अशा कोणत्याही गोष्टीत अडकणार नाही, म्हणूनच तो आदर्श आहे.'

गंभीर 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. तो सध्या आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्स संघाचा मार्गदर्शकही आहे. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 242 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 10 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com