Chhattisgarh Women’s T20 Cup 2023: महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या महिलांचा सलग पाचवा विजय

ओडिशाविरुद्ध शिखा, तनया प्रभावी
Goa Women’s Cricket Team Player Shikha And Tanaya
Goa Women’s Cricket Team Player Shikha And TanayaDainik Gomantak

Chhattisgarh Women’s T20 Cup 2023: गोव्याच्या सीनियर महिला क्रिकेट संघाने छत्तीसगड महिला टी-20 कप क्रिकेट स्पर्धेत शनिवारी सलग पाचव्या विजयाची नोंद करून अव्वल स्थान पटकावले. त्यांनी ओडिशावर शेवटच्या साखळी लढतीत 31 धावांनी मात केली.

सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाला. गोव्याने स्पर्धेची यापूर्वीच अंतिम फेरी गाठली आहे. संघ संकटात असताना झुंझार नाबाद अर्धशतक करणारी गोव्याची शिखा पांडे सामन्याची मानकरी ठरली.

तिने ४९ चेंडूंत सहा चौकार व दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ५९ धावा केल्या. त्यामुळे गोव्याला प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १०७ धावा करणे शक्य झाले.

Goa Women’s Cricket Team Player Shikha And Tanaya
Goa Veterans Football: गोव्‍याचे वेटरन्‍स फुटबॉलपटू पोर्तुगालच्‍या दौर्‍यावर

नंतर तनया नाईक (४-१३) हिचा प्रभावी मारा, तसेच शिखा व तरन्नुम पठाण यांनी टिपलेले प्रत्येकी दोन गडी यामुळे गोव्याने ओडिशाचा डाव १७.५ षटकांत ७६ धावांत गुंडाळला.

स्पर्धेतील अंतिम सामना सोमवारी (ता. २५) खेळला जाईल. विदर्भ व चंडीगड यांच्या रविवारी होणाऱ्या अखेरच्या साखळी सामन्यातील विजेत्या संघाविरुद्ध गोव्याचा संघ अंतिम लढतीत खेळेल.

संक्षिप्त धावफलक

गोवा महिला: २० षटकांत ८ बाद १०७ (पूर्वजा वेर्लेकर १४, तरन्नुम पठाण १, तेजस्विनी दुर्गड ०, शिखा पांडे नाबाद ५९, श्रेया परब ४, विनवी गुरव १६, तनया नाईक १, प्रियांका कौशल ०, दिव्या नाईक ५, निकिता मळीक नाबाद २, रामेश्वरी नायक ४-०-८-३, सुश्री दिव्यादर्शिनी ४-२-१३-३)

वि. ओडिशा महिला: १७.५ षटकांत सर्वबाद ७६ (तन्मयी बेहेरा १०, काजल जेना २२, रानी तुडू १२, शिखा पांडे ४-०-२०-२, निकिता मळीक ३-०-७-०, तरन्नुम पठाण ३-१-१०-२, प्रियांका कौशल २-०-१०-०, दीक्षा गावडे २-०-१६-०, तनया नाईक ३.५-०-१३-४).

Goa Women’s Cricket Team Player Shikha And Tanaya
BCCI AGM Goa 2023: गोव्यात होणार BCCI ची वार्षिक सर्वसाधारण सभा, वर्ल्डकपपूर्वी विविध निर्णयांची शक्यता

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com