BCCI AGM Goa 2023
BCCI AGM Goa 2023Dainik Gomantak

BCCI AGM Goa 2023: गोव्यात होणार BCCI ची वार्षिक सर्वसाधारण सभा, वर्ल्डकपपूर्वी विविध निर्णयांची शक्यता

इंडियन प्रीमियर लीगच्या (WPL) गव्हर्निंग कौन्सिलमध्ये महत्त्वाचा बदल शक्य आहे.
Published on

BCCI AGM Goa 2023: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) गोव्यात वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) होणार आहे. या सभेत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. 25 सप्टेंबर रोजी ही सभा होणार आहे.

यावेळी इंडियन प्रीमियर लीगच्या (WPL) गव्हर्निंग कौन्सिलमध्ये महत्त्वाचा बदल शक्य असून, WPL साठी एक नवीन गव्हर्निंग कौन्सिल स्थापन केली जाण्याची शक्यता आहे.

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलमध्ये इतर खेळाडूंचाही समावेश केला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली असून, सध्या ही भूमिका प्रज्ञान ओझाकडे आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, भारताचा माजी फिरकीपटू प्रज्ञान स्वेच्छेने पद सोडण्याचा विचार करत आहे. ओझाने तीन वर्षे परिषदेवर काम केले आहे. गेल्या वर्षीच त्याची इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनने (सीए) निवड केली होती.

महत्वाची बाब म्हणजे सभेत महिला प्रीमियर लीग साठी गव्हर्निंग कौन्सिलची स्थापना होण्याची शक्यता आहे.

आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये जनरल बॉडीचे आणखी दोन प्रतिनिधी निवडले जावेत, असे सांगण्यात आले होते. बैठकीच्या अजेंड्यामध्ये या मुद्द्यावर देखील चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

लोकपाल आणि नैतिक अधिकारी यांची नियुक्ती देखील बैठकीच्या अजेंड्यावर आहे. तसेच, पुरुष निवड समितीचा आढावा देखील यावेळी घेतला जाईल.

विद्यमान सदस्य हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अरुण सिंग धुमाळ आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अविशेक दालमिया हे त्यांच्या भूमिका पार पाडतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com