Cheteshwar Pujara Century: भारतीय संघाचा वरिष्ठ स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराने कौंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन टू सामन्यात डरहम विरुद्ध ससेक्ससाठी शानदार शतक झळकावले. या मोसमात ससेक्सचा कर्णधार पुजाराने 134 चेंडूत पहिले शतक झळकावले आहे.
एका टप्प्यावर 2 बाद 44 धावा असताना पुजारा आपल्या संघासाठी फलंदाजीसाठी आला, परंतु कर्णधाराने 163 चेंडूत 115 धावा केल्या आणि टॉम क्लार्कसह 112 धावांची भागीदारी केली. क्लार्कने 4 धावांचे योगदान दिले.
दरम्यान, पुजाराची ही शानदार फलंदाजी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाला जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडमध्येच लाल चेंडूने ऑस्ट्रेलियाचा (Australia) सामना करावा लागणार आहे.
अशा परिस्थितीत आतापासून पुजारा इंग्लंडच्या परिस्थितीशी जुळवून घेत आहे, त्यामुळे टीम इंडियाला WTC च्या अंतिम फेरीत त्याचा नक्कीच फायदा होईल. WTC च्या फायनलमध्ये जर पुजाराची बॅट तळपली तर टीम इंडियाला (Team India) चॅम्पियन होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
त्याचवेळी, भारतीय कसोटी संघातील जवळपास सर्व खेळाडू इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामात व्यस्त आहेत. अशा स्थितीत पुजाराने लाल चेंडूसह केलेली तयारी वाखाणण्याजोगी आहे.
पुजाराशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला ससेक्सकडून मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ससेक्सचा कर्णधार पुजारा व्यतिरिक्त ऑलिव्हर कार्टरने 96 चेंडूत 41 धावांची खेळी खेळली.
त्याचबरोबर, नाथ मॅकअँड्र्यू 69 चेंडूत नाबाद 36 धावा आणि हेन्री क्रोकोम्बे 10 धावांवर नाबाद आहे. अशाप्रकारे चक ससेक्स संघाने दिवसाचा खेळ संपला तेव्हा 9 बाद 332 धावा केल्या.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डरहमच्या संघाने पहिल्या डावात 376 धावा केल्या. अशा स्थितीत पहिल्या डावाच्या आधारे डरहमचा संघ ससेक्सपेक्षा 44 धावांनी पुढे आहे. दुसरीकडे, ससेक्सची फक्त एक विकेट शिल्लक आहे.
तसेच, डरहमच्या पहिल्या डावात सलामीवीर मायकेल जोन्स आणि अॅलेक्स लीस यांनी शानदार फलंदाजी केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी झाली. जोन्स 87 धावांवर बाद झाला, तर लीसने 79 धावांचे योगदान दिले. याशिवाय, ग्रॅहम क्लार्कनेही संघाकडून 47 धावांची खेळी केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.