बुद्धिबळ स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर; गोव्यातील स्पर्धेला त्यामध्ये स्थान नाही

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने 2022 मधील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
Chess
Chess Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने २०२२ मधील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केले आहे, मात्र त्यात गोव्यातील (Goa) आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ (Chess) स्पर्धेला स्थान देण्यात आलेले नाही.

Chess
गोव्यातील मडगावमधील 48 कोटींच्या मॉडेल फिश मार्केट प्रकल्पाला मंजुरी

गोवा बुद्धिबळ संघटना निवडणूक (Election) प्रक्रिया सध्या महासंघाच्या अपिल समितीकडे सुनावणीसाठी आहे. त्यामुळे संघटनेच्या कार्यकारी समितीस अजून महासंघाची मान्यता नाही. यावर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या गोवा बुद्धिबळ संघटना निवडणुकीत कार्यकारी समिती बिनविरोध ठरल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जाहीर केल्यानंतर वाद निर्माण झाला. त्यानंतर हे प्रकरण महासंघाच्या नैतिकता आयोगाकडे गेले, या आयोगाने बाकी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश ऑक्टोबरमध्ये दिला. त्यास महासंघाच्या अपिल समितीकडे दाद मागण्यात आली असून त्यावर अजून निर्णय झालेला नाही.

Chess
‘स्वरमंगेश संगीत महोत्सवात’ रंगल्या गायनाच्या मैफली

यापूर्वी तीन वेळा स्पर्धा

गोवा ग्रँडमास्टर (Grandmaster) आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेला २०१८ साली सुरवात झाली. २०१९ मध्ये ही स्पर्धा १८ ते २५ जून या कालावधीत झाली होती. २०२० मध्ये स्पर्धा २ ते ९ जून या कालावधीत नियोजित होती, पण कोविड-१९ मुळे झाली नाही. नंतर स्पर्धा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्या नावे खेळविण्यात आली.

गोव्यात महिला साखळी स्पर्धा

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने गोवा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेस पुढील वर्षीच्या वेळापत्रकात स्थान दिलेले नसले तरी राष्ट्रीय पातळीवरील महिला साखळी स्पर्धा राज्यात खेळविण्याचे ठरविले आहे. ही स्पर्धा १२ ते २० ऑगस्ट या कालावधीत होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com