गोव्यातील मडगावमधील 48 कोटींच्या मॉडेल फिश मार्केट प्रकल्पाला मंजुरी

मत्स्यव्यवसाय विभागाने अंतर्देशीय, सागरी आणि मत्स्यपालन संबंधित सुविधांना चालना देण्यासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे
Model Fish Market
Model Fish MarketDainik gomantak
Published on
Updated on

गोव्यातील (goa) प्राण्यांची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन मंत्रालयाने अनुक्रमे दक्षिण गोवा आणि उत्तर गोव्यात दोन मोबाईल रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भारतातील इतर सर्व राज्यात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच पशुसंवर्धन मंत्री (Minister) परशोत्तम रुपाला यांनी शनिवारी सायंकाळी पंचायत व परिवहन मंत्री माविन गोदिन्हो यांच्या उपस्थितीत नवेवाडे येथील परिवहन व पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांच्या कार्यालयाला भेट दिली त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

Model Fish Market
...म्हणून करण्यात आला आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचा उद्‌घाटन कार्यक्रम रद्द!

पुढे बोलताना ते म्हणाले, मत्स्यव्यवसाय विभागाने अंतर्देशीय, सागरी आणि मत्स्यपालन संबंधित सुविधांना चालना देण्यासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ज्याचा फायदा संपूर्ण भारतातील मासेमारी समुदायाच्या सदस्यांना होईल. तसेच मत्स्यव्यवसाय विभागाने दक्षिण गोव्यातील मडगाव (Margao) येथे मॉडेल फिश मार्केट प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव दिला असून, त्यासाठी 48 कोटी रुपये खर्च आला असून, मत्स्यव्यवसाय विभागाने या प्रकल्पाला मंजुरी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Model Fish Market
आदिवासी बहुल राज्‍यांसाठी केंद्राकडून अंदाजपत्रकात 10 टक्के तरतूद

19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिनानिमित्त दाबोलीम (Dabolim) मतदारसंघात विंटेज कार रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वाहतूक आणि पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली. गोवा मुक्ती दिनासंबंधीचा कार्यक्रम प्रथमच चिकली पंचायत मैदानावर आयोजित केला जाईल ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक भेट देतील आणि या सोहळ्याचे साक्षीदार असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa bench Fire Case
Supreme Court PWD Workers Goa
Goa Forward Suspends Alliance Talks
Swiggy Rs 93 Lakh Theft
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com