ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली ला (Brett Lee) जगातील महान गोलंदाजांमध्ये पाहिले जाते. हा खेळाडू त्याच्या वेगासाठी ओळखला जातो आणि आजही जेव्हा तुफान गोलंदाजांचा विचार केला जातो तेव्हा त्यात ब्रेट लीचे नाव येतेच. ली सध्याच्या वेगवान गोलंदाजांबद्दल सतत बोलत राहतो, पण त्याला आजच्या काळातील एक गोष्ट अजिबात आवडत नाही. लीने म्हटले आहे की, जर तो प्रशिक्षक असता तर त्याने काही गोष्टी ताबडतोब काढून टाकल्या असत्या आणि त्यापैकी एक म्हणजे कंप्यूटर.
ब्रेट ली अलीकडेच लीजेंड्स क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसून आला होता. त्याने सध्याच्या काळात वेगवान गोलंदाजांबद्दलच्या होत असलेल्या गोष्टींबद्दल बोलला आहे आणि काही समजही मोडीस काढली आहे. लीने पाकिस्तानचा (Pakistan) माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या (Shoaib Akhtar) यूट्यूब चॅनलवरती बोलताना याबद्दचा खलासा केला.
ली आणि अख्तर त्यांच्या काळातील तुफानी गोलंदाजांमध्ये मोजले जातात. ली म्हणाला की, मी जर प्रशिक्षक असतो तर मी संगणक काढून टाकले असते. मी गोलंदाजांना स्प्रिंट करायला आणि शक्य तितकी गोलंदाजी करायला लावले असते. यावेळी गोलंदाज खूपच कमी गोलंदाजी करत आहेत. गोलंदाजाने कमी गोलंदाजी केली तर त्याला कमी दुखापत होणार.
गोलंदाजांनी कशावर काम केले पाहिजे हे लीने यावेळी सांगितले. तो म्हणाला की, “तुम्हांला तुमचे शरीर मजबूत करण्यासाठी अधिकाअधिक गोलंदाजीचा सराव केला पाहिजे. तुम्हाला पळण्याचा देखील सराव हवा आहे. जर कोणी मला 24 चेंडू टाकून विश्रांती घेण्यास सांगितले तर मी हसेन, पण आपण तेच आहोत.
लीने त्याच्या काळातील फलंदाजांबद्दलही सांगितले आणि ज्या गोलंदाजासमोर त्याला त्रास व्हायचा त्याचे नावही त्याने सांगितले आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) गोलंदाजी त्याला अजिबात आवडली नाही. ली म्हणाला की, मला सचिनने गोलंदाजी करणे आवडत नव्हते. त्याची गोलंदाची उत्कृष्ट होती. तसेच, मला मुथय्या मुरलीधरन सोबतचा सामना अजिबात आवडत नव्हता. त्यांचा सामना करणे खुप कठीण होते. मी त्यांना कधीच पकडू शकलो नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.