पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याबाबत 'या' ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केले मोठे वक्तव्य
ऑस्ट्रेलियचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या संघातील काही खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यासाठी नकार दिल्यास आश्चर्य वाटायला नको, असे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ मार्चमध्ये पाकिस्तानचा (Pakistan) दौरा करणार आहे. 1998 नंतर ऑस्ट्रेलियाचा (Australia) संघ पाकिस्तानचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. हेझलवूड म्हणाला, दौऱ्यादरम्यान अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन (एसीए) ने या दौऱ्यासंबंधी खूप काम केले आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्यात तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि एक टी-20 सामने असतील. कसोटी सामने कराची (3-7 मार्च), रावळपिंडी (12-16 मार्च) आणि लाहोर (21-25 मार्च), तर 29 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान लाहोरमध्ये एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळवले जातील. हेझलवूडला अॅशेस कसोटी मालिकेत (Ashes Series) चार सामन्यांना मुकावे लागले होते. मात्र संघाने ही मालिका 4-0 ने जिंकली होती. पाकिस्तानमधील सुरक्षेची परिस्थिती चिंताजनक असल्याने संघ तिथे जाण्यास टाळाटाळ करत आहे.
तसेच, 2009 मध्ये श्रीलंकेचा (Sri Lanka) संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला असताना तिथे दहशतवादी हल्ला झाला होता. पाहुण्या संघाच्या बसवर अंदाधुंद गोळीबार दहशतवाद्यांकडून करण्यात आला होता. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नव्हती. यावेळी महेला जयवर्धने, कुमार संगकारा आणि मुथय्या मुरलीधरन सारखे खेळाडू संघाचा भाग होते. यानंतर त्यांना एअरलिफ्ट करुन घरी पाठवण्यात आले होते. अफगाणिस्तानामध्ये तालिबान पुन्हा सत्तेत आल्यामुळे सुरक्षा परिस्थितीबाबत चिंता वाढली आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये न्यूझीलंड क्रिकेट संघाने सुरक्षेच्या कारणास्तव या दौऱ्यातून माघार घेतली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.