

पर्ये: मडगाव येथे झालेल्या १४ वर्षांखालील मिनी टेनिस बॉल क्रिकेटच्या राष्ट्रीय स्पर्धेत सत्तरीतील कोपर्डे येथील अवनी दिनेश सावंत हिने अष्टपैलू कामगिरी करत गोव्याला राष्ट्रीय विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्पर्धेतील उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा मानही तिने मिळवला.
अवनीने संपूर्ण स्पर्धेत प्रभावी गोलंदाजी केली. कर्नाटकविरुद्ध एका षटकात दोन बळी घेतल्यानंतर महाराष्ट्राविरुद्धही दोन बळी घेत केवळ पाच धावा दिल्या. अंतिम सामन्यात तामिळनाडूचे फलंदाज धावांचा पाऊस पाडत असताना अवनीने दोन महत्त्वाचे बळी घेत केवळ दोन धावा दिल्या.
अंतिम सामन्यात शेवटच्या षटकातील एक चेंडू बाकी असताना अवनी नॉन-स्ट्रायकर होती. सहखेळाडू बाद झाल्यानंतर तामिळनाडूने विजयाचा जल्लोष केला. मात्र, अवनीने आपण क्रीजमध्ये पोहोचल्याचे सांगत पंचांना रिप्ले तपासण्याची विनंती केली. रिप्लेनंतर गोव्याला एक धाव मिळाली आणि सामना बरोबरीत सुटला. सुपर ओव्हरमध्ये गोव्याने आठ धावा करत तामिळनाडूला सहा धावांवर रोखले आणि विजेतेपद पटकावले.
मार्गदर्शनाचा लाभ
प्रशिक्षक-शिक्षक हरीश पार्सेकर आणि निकिता नाईक यांचे अवनी सावंतला मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा मला मोठा लाभ झाल्याचे अवनीने सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.