Goa Boxing: भारतीय संघात गोव्याचं नेतृत्त्व 'शगुन' करणार

इराकमध्ये 28 नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय स्पर्धा
Goa Boxing
Goa BoxingDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: इराकमध्ये होणाऱ्या एएसबीसी सबज्युनियर मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धेसाठी गोव्याची युवा बॉक्सर शगुन शिंदे हिची भारतीय संघात निवड झाली आहे. येत्या 28 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत सुलेमानिया येथे स्पर्धा होईल.

(Boxer Shagun Shinde from Goa has been selected in the Indian team)

राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या शगुन हिने राष्ट्रीय संघ निवड चाचणीत शानदार कामगिरी बजावताना तिन्ही लढती जिंकल्या. राष्ट्रीय शिबिरात तिला, तसेच अन्य 13 सबज्युनियर बॉक्सरना मुख्य प्रशिक्षक गीता चानू व इतर प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Goa Boxing
Virat Kohli ला पहिल्यांदाच मिळाला आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार

शगुन शिंदे ही पेडे-म्हापसा येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्र हॉस्टेलची प्रशिक्षणार्थी आहे. यावर्षी जानेवारीत तिने या केंद्रात प्रवेश घेतला. तेथे तिला आरिफउद्दीन यांचे मार्गदर्शन लाभले.‘‘शगुन सुरवातीपासून चांगल्या कामगिरीसाठी प्रेरित होती, ती तांत्रिकदृष्ट्या तरबेज आहे. व्यापक संधीद्वारे ती आणखीनच प्रगल्भ होईल. तिचे भविष्य उज्ज्वल आहे,’’ असे मत आरिफ यांनी व्यक्त केले.

Goa Boxing
Goa Cricket: पंजाबची विजयी दौड कायम तर गोव्याची पिछेहाट

गोव्यात मिळाली संधी

शगुन हिचे वडील परेश शिंदे हे मूळचे पुण्यातील, आता ते गोव्यात स्थायिक झालेत. गोवा हौशी बॉक्सिंग संघटनेने आपल्या मुलींच्या गुणवत्तेस योग्य संधी दिली, तिला पाठिंबा देत प्रेरित केल्याचे परेश यांनी नमूद केले. संघटनेचे पदाधिकारी लेनी डिगामा यांनी शगुनवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली, त्यामुळे तिचा हुरूप वाढला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोव्यातील बॉक्सिंगमध्ये ‘वूमन पॉवर’

गोवा हौशी बॉक्सिंग संघटनेच्या सचिव दानुष्का दा गामा यांनी राज्यातील महिला बॉक्सरच्या प्रगतीकडे लक्ष वेधले. ‘‘वैष्णवी प्रभू, सुमन यादव, आश्रेया नाईक यांच्यानंतर आता शगुन हिच्या निवडीमुळे गोव्यातील मुली आंतरराष्ट्रीय रिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करू शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले,’’ असे दानुष्का म्हणाल्या.

मागील दोन वर्षांत गोव्याने राष्ट्रीय बॉक्सिंगमध्ये आश्वासक निकाल नोंदविले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डिसेंबरमध्ये संघटनेची निवडणूक होईल. त्यावेळी शगुन शिंदे, तसेच गुजरातमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील ब्राँझपदक विजेता पुष्पेंद्र राठी यांचा गौरव केला जाईल, अशी माहितीही दानुष्का यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com