Goa Cricket: पंजाबची विजयी दौड कायम तर गोव्याची पिछेहाट

पंजाबने विजयासह केली सात गुणांची कमाई
Sharjah Cricket Stadium
Sharjah Cricket StadiumDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: फलंदाजीतील कमजोरी कायम राहिल्यामुळे गोव्याला 19 वर्षांखालील कूचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत मोठ्या पराभवास सामोरे जावे लागले. पंजाबने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी डाव व 74 धावांनी दणदणीत विजय नोंदवून बोनस गुणाचीही कमाई केली. (Punjab won the Cuchbehar Karandak Cricket Tournament Defeating Goa)

सांगे येथील जीसीए मैदानावर झालेल्या या लढतीत पंजाबने सोमवारी सकाळी गोव्याला फॉलोऑन दिला. 255 धावांच्या पिछाडीवरून गोव्याचा दुसरा डाव 181 धावांत आटोपला, त्यांना पहिल्या डावातील तुलनेत चार धावा जास्त केल्याचेच समाधान लाभले. जखमी पुंडलिक नाईक दोन्ही डावात फलंदाजीस उतरला नाही. पंजाबने विजयासह एकूण सात गुणांची कमाई केली. गोव्याचा स्पर्धेतील पुढील सामना शनिवारपासून (ता. 12) बडोद्याविरुद्ध बडोदा येथे खेळला जाईल.

चांगल्या प्रारंभानंतर पडझड

गोव्याची दुसऱ्या डावातील सुरवात सकारात्मक होती. पहिल्या डावात शानदार 70 धावा केलेल्या देवनकुमार चित्तेम (41) याने इझान शेख (28) याच्यासमवेत गोव्याला 69 धावांची सलामी दिली, मात्र दोघेही एका धावेच्या अंतराने बाद झाल्यानंतर गोव्याला सावरताच आले नाही.

उपाहारापूर्वीच गोव्याने पहिले पाच फलंदाज 84 धावांत गमावले. यश कसवणकर (31) व वर्धन मिस्कीन (25) यांनी सहाव्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली, पण ते संघाचा पराभव टाळू शकले नाहीत. आठव्या क्रमांकावरील फलंदाज रिजुल पाठक याने 36 धावा केल्यामुळे गोव्याला पावणेदोनशे धावांचा टप्पा ओलांडला आला.

संक्षिप्त धावफलक: पंजाब, पहिला डाव : 432

गोवा, पहिला डाव: 9 बाद 177 व दुसरा डाव : 74.1 षटकांत सर्वबाद 181 (देवनकुमार चित्तेम 41, इझान शेख 28, आर्यन नार्वेकर 1, सनथ नेवगी 10, दीप कसवणकर 0, यश कसवणकर 31, वर्धन मिस्किन 25, रिजुल पाठक 36, फरदीन खान 0, शिवांक देसाई नाबाद 0, आराध्य शुक्ला 3-36, क्रिश भगत 2-26, रणदीप सिंग 1-34, इमानज्योत चहल 3-38).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com