Virat Kohli ला पहिल्यांदाच मिळाला आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार

ICC Men's Player of the Month: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कडून प्रथमच महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे.
Virat Kohli
Virat KohliTwitter/@Twitter
Published on
Updated on

Virat Kohli ICC Mens Player Of The Month : भारतीय क्रिकेटचाच नाही तर जागतिक क्रिकेटमधील स्टार फलंदाज विराट कोहलीला 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ' (ICC Player of the month) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) विराट अप्रतिम खेळी करत असल्याने त्याला याच खेळीची जणू पोचपावती मिळाली आहे.

विराटसोबत वर्ल्डपमध्ये चांगली कामिगिरी करणारे आणखी दोन खेळाडूही नॉमिनेट झाले होते यामध्ये झिम्बाब्वेचा सिकंदर रझा (Sikandar Raza) आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर यांचा समावेश होता. पण विराटची खेळीही विराट असून प्रेक्षकांनीही त्यालाच पसंती दिल्याने विराटने पुरस्कारावर नाव कोरले आहे. तर महिलांमध्ये पाकिस्तानची निदा दार विजयी झाली आहे

  • कोहलीची टी20 वर्ल्ड कप 2022 मधील कामगिरी

विश्वचषकाची सुरुवात झाल्यापासून विराट कोहली दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. सर्वात पहिला भारताचा सामना पाकिस्तानसोबत झाला. ज्यात एकीकडे भारतीय फलंदाजी ढासळत असताना विराटने एकहाती झुंज दिली. त्याने सामना जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात नेदरलँडविरुद्ध 44 चेंडूत नाबाद 62 धावा विराटनं केल्या. मग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराट 12 धावाच करु शकला. पण मग बांगलादेशविरुद्ध विराट 44 चेंडूत 62 धावा करुन पुन्हा फॉर्मात परतला. त्यानंतर नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात विराटने 26 धावा केल्या असून अशारितीने एकूण 5 सामन्यात त्यानं 246 धावा केल्या आहेत.  

  • आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अवार्ड

आयसीसीने क्रिकेटमध्ये उत्साह वाढवण्यासाठी हा पुरस्काराची सुरुवात केली होती. प्रत्येक महिन्याला हा पुरस्कार दिला जातो. दरम्यान, पुरूष आणि महिला संघातील जे खेळाडू महिन्याभरात चांगली कामगिरी करून दाखवतात. त्यांची निवड करून त्यापैकी एकाला हा पुरस्कार दिला जातो. पुरुषांमध्ये विराटला तर महिला क्रिकेटमध्ये भारताची जेमिमा रॉड्रीग्ज, दिप्ती शर्मा आणि पाकिस्तानच्या निदा दार यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com