Viral Video: क्रिकेटच्या दोन दिग्गजांमध्ये लागली सायकल शर्यत; पाहा कोण जिंकलं?

जावेद मियांदाद आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यातील सायकल शर्यत
Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

क्रिकेटच्या दोन दिग्गजांनी मैदानावर एकमेकांसोबत सायकल शर्यत लावली. व्हिव्हियन रिचर्ड्स (Vivian Richards) आणि जावेद मियांदाद (Javed Miandad) क्रिकेटच्या मैदानावर अनेकवेळा एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिले होते. पण, दोघांची क्रिकेटच्या मैदानावरील शर्यत अनेकांसाठी संस्मरणीय ठरली आहे. पाकिस्तान ज्युनियर लीगच्या दरम्यान दोघेही एकत्र आले होते. त्यावेळी दोघांनी ही मजेशीर शर्यत लावली.

Viral Video
BCCI vs PCB: जय शाहांच्या वक्तव्यावर PCB चा संताप; 'बैठक बोलवून दिली ही धमकी'

व्हिव्हियन रिचर्ड्स आणि जावेद मियांदाद यांनी लावलेल्या या शर्यतीत दोघांनीही जिंकण्यासाठी प्रयत्न केला. प्रेक्षक देखील दोघांना चिअर्स करताना दिसत आहेत. पण, अखेर जावेद मियांदाद यांनी ही शर्यत जिंकली. यावेळी एक जण क्रिकेट सारखी कॉमेन्ट्री करताना दिसत आहे. दरम्यान, या शर्यतीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Viral Video
IND vs NZ Warm-Up: आज टीम इंडियाचा दुसरा सराव सामना, न्यूझीलंडविरुद्ध भिडणार

व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी आपल्या कारकिर्दीत 121 कसोटी सामने खेळताना 50.23 च्या सरासरीने 8,540 धावा केल्या आहेत. ज्यात त्याच्या 24 शतके आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, जावेद मियांदाद यांनी 124 कसोटी सामने खेळत, 52.57 च्या सरासरीने 8,832 धावा केल्या. मियांदाद यांनी 23 शतकांसह 43 अर्धशतकं झळकावली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com