IND vs NZ Warm-Up: आज टीम इंडियाचा दुसरा सराव सामना, न्यूझीलंडविरुद्ध भिडणार

IND vs NZ: भारताने पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट टिम आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आज टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) सराव सामना आहे. भारताने पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून आज न्यूझीलंडविरोधात विजयासाठी मैदानात भिडणार आहे. सराव सामने विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने दोन्ही संघ विजयासाठी अथक प्रयत्न करतील. जाणून घेउया आजच्या सामन्याबद्दलची महत्त्वाची माहिती....

  • कधी आहे सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड (Zealand) यांच्यातील हा सराव सामना आज अर्थात 19 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना सुरु होईल. त्याआधी अर्धातास नाणेफेक होणार आहे.

  • कुठे आहे सामना?

हा सामना ब्रिस्बेनच्या गाबा क्रिकेट स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे.

  • कुठे पाहता येणार सामना?

डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.

Team India
U-17 WC: जपानच्या वेगापुढे फ्रान्सचे लोटांगण
  • पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय

भारत (India) आणि ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या सराव सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राहुल आणि सूर्या दोघांनी अर्धशतकं झळकावत अनुक्रमे 57 आणि 50 धावा केल्या. दिनेशनं 20 धावांची फिनिशिंग दिल्याने भारताची धावसंख्या 186 पर्यंत पोहोचली. 187 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मिचेल मार्श आणि आरॉन फिंच यांनी कमाल सुरुवात केली. 35 धावा करुन मार्श बाद झाला पण कॅप्टन फिंच क्रिजवर कायम होता. स्मिथ आणि मॅक्सवेलनं प्रत्येकी 11 आणि 23 धावा केल्या, पण त्या दोघानंतर इतर फलंदाजांना दुहेरी संख्याही गाठता आली नाही. फिंचनं अर्धशतक झळकावून संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा संपूर्ण प्रयत्न केला. पण 19 व्या ओव्हरमध्ये हर्षलनं त्याला 76 धावांवर बाद केलं आणि भारताच्या विजयाच्या आशा जिवंत झाल्या. त्यानंतर शेवटची ओव्हर टाकण्यासाठी शर्मानं प्लेईंग 11 मध्ये नसणाऱ्या मोहम्मद शमीला मैदानात बोलवलं आणि शमीने कमाल करत सामना भारताला जिंकवून दिला. एक विकेट रनआऊट असल्याने शमीची हॅट्रीक हुकली पण त्याने सामना भारताला 6 धावांनी जिंकवून दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com