Asia Cup 2023: आशिया चषक 2023 साठी टीम इंडियाला पाकिस्तानात न पाठवण्याच्या बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आशियाई क्रिकेट परिषदेला (ACC) आपत्कालीन बैठक बोलावण्याची विनंती केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) म्हटले की, 'अशा वक्तव्यांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट समुदायात फूट पडण्याची शक्यता जास्त आहे. 2023 विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या भारत दौऱ्यावर परिणाम होऊ शकतो.'
जय शाह यांच्या वक्तव्याने पीसीबी संतापले
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( BCCI) सचिव जय शाह यांनी पुढील वर्षी आशिया चषकासाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाऊ शकणार नाही, असे वक्तव्य केले होते. जय शाह यांच्या मते, भारत आशिया कप स्पर्धा पाकिस्तानऐवजी (Pakistan) तटस्थ ठिकाणी खेळण्यास प्राधान्य देईल. जय शाह आशियाई क्रिकेट परिषद (ACC) चे अध्यक्ष देखील आहेत.
तातडीने बैठक बोलावून ही धमकी देण्यात आली
पीसीबीने एका निवेदनात म्हटले आहे की, "अशा वक्तव्यांमुळे आशियाई आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट समुदायांमध्ये फूट पडण्याची शक्यता जास्त आहे. विश्वचषक 2023 आणि 2024-31 च्या भारतातील आयसीसी स्पर्धांसाठी पाकिस्तानचा भारत दौरा रोखू शकतो."
ACC कडून कोणतेही अधिकृत विधान नाही
निवेदनानुसार, “पीसीबीला (PCB) आतापर्यंत एसीसी अध्यक्षांच्या वक्तव्यावर एसीसीकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण मिळालेले नाही.'' PCB ने आता आशियाई क्रिकेट कौन्सिलला आपल्या बोर्डाची तातडीची बैठक बोलावून महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यावर चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.
भारताने शेवटचा पाकिस्तानला 2008 मध्ये भेट दिली होती
श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे टी-20 आशिया चषक गेल्या महिन्यात तेथून यूएईला हलवण्यात आला होता. दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे केवळ आशियाई आणि आयसीसी स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध खेळतात. भारताने शेवटचा पाकिस्तान दौरा 2008 मध्ये केला होता तर पाकिस्तानने शेवटची मालिका 2012-13 मध्ये भारतात खेळली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.