Virat Kohli Bowling: 'विराटला वाटतं तोच सर्वोत्तम बॉलर...', भुवीचा गमतीशीर खुलासा

Bhuvneshwar Kumar: विराट कोहलीच्या गोलंदाजीवेळी संघातील खेळाडू का घाबरलेले असतात, याचा खुलासा भुवनेश्वर कुमारने केला आहे.
Virat Kohli | Bhuvneshwar Kumar
Virat Kohli | Bhuvneshwar KumarDainik Gomantak
Published on
Updated on

Bhuvneshwar Kumar hilarious comment on Virat Kohli bowling: विराट कोहली सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याने फलंदाजीत अनेक मोठमोठे विक्रमही केले आहे. पण त्याची गोलंदाजी त्याच्या संघसहकाऱ्यांसाठीही गमतीचा विषय राहिली आहे. याबद्दलच भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

सीएट (CEAT) क्रिकेट पुरस्कार कार्यक्रमात बोलताना भुवनेश्वर कुमारने विराट कोहलीच्या गोलंदाजीवर भाष्य केले आहे. त्याने म्हटले आहे की विराट गोलंदाजी करत असताना त्याच्या संघातील खेळाडू धास्तावलेले असतात.

Virat Kohli | Bhuvneshwar Kumar
Virat Kohli: लहानपणापासून जो पेपर वाचतोय, तो सुद्धा...; फेक न्यूज विरोधात किंग कोहलीचा पुढाकार

भुवनेश्वर कुमार म्हणाला, 'विराट कोहलीला वाटते की तो संघातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. तो गोलंदाजी करत असताना आम्ही नेहमीच घाबरलेलो असतो, कारण तो त्याच्या गोलंदाजी शैलीमुळे स्वत:ला दुखापतग्रस्त करू शकतो.'

याशिवाय भुवनेश्वर कुमारने असेही म्हटले की 'विराट जर क्रिकेटपटू नसता, तर तो कुस्तीपटू होऊ शकला असता.'

दरम्यान, विराट कोहलीने खूप कमी वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली आहे. विशेष म्हणजे २१ ऑगस्ट रोजी आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणेवेळी भारताचा कर्णधार रोहित शर्माला पार्ट टाईम गोलंदाजांबद्दल प्रश्न विचारला होता, त्यावेळी त्याने तो आणि विराट गोलंदाजी करू शकतात असे गमतीने उत्तर दिले होते.

Virat Kohli | Bhuvneshwar Kumar
Virat Kohli: विराटला उगीचच 'रनमशीन' म्हणत नाहीत, खेळपट्टीवर किती किमी धावाला... आकडा पाहून व्हाल अवाक

वर्ल्डकप २०११ स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघात युवराज सिंग, सुरेश रैना, सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग असे फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही योगदान देऊ शकणारे खेळाडू होते.

याबद्दलच बोलताना रोहित म्हणला होता, '२०११ च्या संघात असे खेळाडू होते, जे गोलंदाजी आणि फलंदाजी करू शकत होते. जे सध्या आमच्याबरोबर आहेत, त्यांचा विचार करायला हवा. जे सर्वोत्तम आहेत आणि कामगिरी करत आहेत, त्यांना आम्ही संधी देतो.

'आम्ही एका रात्रीत संघात असा खेळाडू तयार करू शकत नाही, जो गोलंदाजी करू शकेल. जे फलंदाज आहेत, ते धावा करतात आणि म्हणू ते संघाचा भाग आहेत. पण आशा आहे की शर्मा आणि कोहली वर्ल्डकपमध्ये गोलंदाजीत हात आजमावतील.'

रोहित आणि विराट कोहली यांनी यापूर्वी गोलंदाजी केली आहे. पण गेल्या काही काळात ते फारशी गोलंदाजी करताना दिसलेले नाही. रोहितने गोलंदाजी करताना कसोटीत 2 विकेट्स, वनडेत 8 विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 1 विकेट घेतली आहे. तसेच विराटने वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com