Virat Kohli: विराटला उगीचच 'रनमशीन' म्हणत नाहीत, खेळपट्टीवर किती किमी धावाला... आकडा पाहून व्हाल अवाक

Virat Kohli: विराट कोहली गेल्या 15 वर्षात आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत धावा घेताना किती किमी धावलाय जाणून घ्या.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

Virat Kohli run roughly 510km between wickets in his 15 years of International Cricket Career:

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला रनमशीन म्हणूनही ओळखले जाते. त्याने नुकतेच 18 ऑगस्ट रोजी त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 15 वर्षे पूर्ण केली. त्याने गेल्या 15 वर्षात अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याने 25 हजारांहून अधिक धावाही केल्या.

विराट हा नेहमीच मोठ्या फकटे मारण्याबरोबरच खेळपट्टीवर एकेरी-दुहेरी धावा घेत धावफलक हलता ठेवणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो. तो बऱ्याचदा हवेतील फटकेबाजीबरोबरच मैदानी फटके खेळण्यावरही विश्वास ठेवतो.

Virat Kohli
Virat Kohli: 'पुढच्या वेळी नक्की...', घाईत असलेल्या विराटचे चाहत्याला प्रॉमिस, पाहा Video

दरम्यान, त्याच्याबाबतीत एक अचंबित करणारी आकडेवारी समोर आली आहे. विराट त्याच्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत खेळपट्टीवर जवळपास 510 किमी धावला आहे.

इएसपीएन क्रिकइन्फोच्या आकडेवारीनुसार चेंडू सीमापार न जाणारे फटके (non-boundary scoring shots) खेळताना तो खेळपट्टीवर साधारण 277 किमी धावला आहे. तसेच तो त्याच्या साथीदार फलंदाजासाठी 233 किमी धावला आहे. म्हणजेच तो जवळपास 510 किमी धावला आहे.

विराटने त्याच्या कारकिर्दीत चौकार आणि षटकार न मारता 13,748 धावा खेळपट्टीवर धावताना केल्या आहेत.

यादरम्यान तो साधरण 276.57 किमी धावला आहे. तसेच त्याच्या साथीदारासाठी त्याने 11,606 धावांसाठी योगदान दिले असून तो यादरम्यान साधरण 233.04 किमी धावला आहे.

Virat Kohli
Virat Kohli: लहानपणापासून जो पेपर वाचतोय, तो सुद्धा...; फेक न्यूज विरोधात किंग कोहलीचा पुढाकार

विराटची कारकिर्द

विराटने आत्तापर्यंत त्याच्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत 111 कसोटी सामने खेळले असून 49.29 च्या सरासरीने 8676 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 29 शतकांचा आणि 29 अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच वनडेत त्याने 275 सामने खेळले असून 46 शतके आणि 65 अर्धशतकांसह 57.32 च्या सरासरीने 12898 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 115 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 1 शतक आणि 37 अर्धशतकांसह 4008 धावा केल्या आहेत.

विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेली 76 शतके त्याने वेगवेगळ्या 46 ठिकाणी खेळताना केली आहेत. त्यामुळे तो सर्वाधिक ठिकाणी आंतरराष्ट्रीय शतके करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर असून त्याने 53 ठिकाणी एकूण 100 शतके केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com