Virat Kohli: लहानपणापासून जो पेपर वाचतोय, तो सुद्धा...; फेक न्यूज विरोधात किंग कोहलीचा पुढाकार

Fake News: विराट त्याच्या अलिबागच्या फार्म हाऊसवर क्रिकेट पीच तयार करत आहे आशा बातम्या समोर आल्या होत्या. मात्र विराटने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करून हा दावा फेटाळला आहे.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

Virat Kohli Instagram Post: स्टार क्रिकेटपटू विराट कोहली सध्या क्रिकेटच्या मैदानाबाहेर असला तरी त्याच्याबद्दलच्या चर्चेने क्रीडा विश्वातील वातावरण कायमच गरम असते.

आशियातील सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेला विराट सतत व्हायरल होणारे फोटो शेअर करत असतो. पण आता कोहलीने त्याच्याशी संबंधित खोट्या बातम्यांविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.

सोशल मीडियावरून त्याच्या उत्पन्नाचा दावा करणाऱ्या बातम्या फेटाळल्यानंतर काही दिवसांनी, कोहलीने मंगळवारी आणखी एक वृत्त फेटाळून लावले ज्यात म्हटले होते की तो आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा त्यांच्या अलिबाग फार्महाऊसवर 'क्रिकेट पीच तयार करणार आहेत'.

Virat Kohli
Rohit Sharma: 'जडेजाचा तो कॅच...', रोहितने सांगितली वर्ल्डकपमधील अविस्मरणीय आठवण

वृत्तपत्राचा दावा

खरं तर, सोमवारी देशातील एका आघाडीच्या वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, अनुष्का आणि विराटने फार्महाऊस बांधण्यासाठी अलिबागमधील 8 एकर जमिनीवर 19.24 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

दुसर्‍या पब्लिशिंग हाऊसचा हवाला देऊन, अहवालात पुढे नमूद केले आहे की विराट प्रॉपर्टीवर क्रिकेट खेळपट्टी बांधण्यास उत्सुक होता आणि घराच्या बांधकामाशी संबंधित सर्व गोष्टींची तो काळजी घेत आहे.

Virat Lohalis Instagram Post
Virat Lohalis Instagram PostDainik Gomantak

कोहलीने दावा फेटाळला

अलिबागच्या फार्म हाऊसवर खेळपट्टी बनवल्याची बातमी समोर येताच सर्वत्र व्हायरल झाली. यावर अखेर विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आणि फेक न्यूज पसरवल्याबद्दल दैनिकावर नाराजी व्यक्त केली.

इंस्टाग्रामवर बातमीचा स्क्रीनशॉट टाकत त्याने लिहिले की, 'मी लहानपणापासून वाचत असलेल्या वर्तमानपत्राने आता फेक न्यूज छापायला सुरुवात केली आहे'.

खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल कोहली खूपच नाराज असल्याचे या पोस्टवरून स्पष्ट झाले आहे.

Virat Kohli
Donavon Ferreira: 5 चेंडूत 5 षटकार ठोकणारा कोण आहे दक्षिण आफ्रिकेचा रिंकू सिंह? आता कांगारुंना पाजणार पाणी

कोहलीने याआधीही या फेक न्यूजचे खंडन केले आहे

अशा अफवांना रोखण्यासाठी कोहलीने सोशल मीडियावर जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडे सोशल मीडियावरून कोहलीच्या कमाईच्या बातम्या येत होत्या.

असा दावा करण्यात आला की त्याने इंस्टाग्रामच्या माध्यमातून प्रायोजित पोस्टसाठी तब्बल 11.4 कोटी रुपये कमावले.

या वृत्तांचे खंडन स्वतः कोहलीने केले होते, ट्विटरवर स्पष्ट केले की त्याच्या सोशल मीडिया कमाईबद्दलचे वृत्त खरे नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com